Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांना वाढता पाठिंबा…


करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस चुरस निर्माण झालेली असून दिवसेंदिवस आमदार संजयमामा शिंदे गटाला विविध कार्यकर्त्यांसह पक्षांचा ,संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. काल दि.8 नोव्हेंबर रोजी जनाधार असलेले आर.पी.आयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश कांबळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन 2024 च्या करमाळा विधानसभा निवडणुकीत आपण महायुती व महाविकास आघाडीला धडा शिकवणार असून दलित समाजाची संपूर्ण ताकद आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे प्रतिपादन करून या निवडणुकीमध्ये दलित समाज किंगमेकरची भूमिका पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
आज 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केमिस्ट्री भवन करमाळा येथे आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून त्यामध्ये करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आ.संजयमामा शिंदे हेच एकमेव पर्याय असल्यामुळे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय बापू घोलप व पक्षाचे सर्व पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.
यापूर्वीच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य गणेशभाऊ चिवटे यांनीही आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. लवकरच ते मोठा मेळावा घेऊन पाठिंबा जाहीर करणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष ,वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत. दिवसेंदिवस आमदार संजयमामा शिंदे यांच्या कॉर्नर सभा व जाहीर सभेमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून त्यांचा वाढता पाठिंबा विरोधकांची डोकेदुखी ठरणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

8 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

22 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

1 day ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago