करमाळा प्रतिनिधी
करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांनी ५ वर्षात अतिशय चांगले काम केले असून त्याचा बदल सध्या दिसतो आहे. येणाऱ्या काळात कोणाचे सरकार येईल हे माहित नाही पण जे सरकार येईल ते काटावर येईल असे चित्र आहे. त्यात अपक्षाला चांगली संधी असून संजयमामा यांना तुम्ही पुन्हा आमदार करा. नक्कीच यापेक्षा अधिक चांगले दिवस येतील,’ असा विश्वास आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला.
वांगी येथे अपक्ष उमेदवार आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभे प्रसंगी आमदार बबनदादा शिंदे बोलत होते. आमदार बबनदादा म्हणाले की, ‘आमदार संजयमामा शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणसाला त्यांनी कायम न्याय दिला आहे. करमाळा- टेंभुर्णी महामार्गाचे काम करण्यासाठी त्यांना कायम पाठपुरावा केला आहे. तेव्हा ते काम मार्गी लागलेले आहे. काही मंडळींनी यामध्ये जाणीवपूर्वक अडचणी आणल्या. परंतु त्या अडचणी वरती मात करून महाराष्ट्र शासनाचा ना हरकत दाखला त्यांनी मिळवून दिला .त्यामुळेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे वर्ग झाला. त्याच्या भूसंपादनाचे काम आता सुरू आहे .लवकरच प्रत्यक्ष कामकाजालाही सुरुवात होणार आहे’ असे ते यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना आमदार बबनदादा म्हणाले, ‘विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना झाला तेव्हापासून करमाळा आणि आमचे नाते निर्माण झाले आहे. अडचणीची परिस्थिती असतानाही हा कारखाना दरवर्षी तालुक्यातील ऊस गाळप करत आहे. याचे सर्व पैसे वेळेवर आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने सतत काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या तालुक्यात सध्या चार कारखाने आहेत. तेथे तुळशीच्या लग्नाला ऊसही मिळत नव्हता पण आता तेथील प्रगती झाली आहे. कोणत्याही बाबतीत आमच्याकडून अडवणूक होत नाही. करमाळ्यात केळी संशोधन केंद्र व्हावे म्हणून आमदार संजयमामा यांनी पाठपुरावा केला आहे. याबाबत विधानसभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आरोग्य क्षेत्रातही त्यांचे चांगले काम आहे. उजनी पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून त्याला निधी मिळवला आहे. उजनी धरणात मत्सबीज सोडण्यासाठीही त्यांनी निधी मिळवला आहे’, असे त्यांनी सांगितले.
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…