रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी लागल्यास वीट ,रावगांव, मांगी, जातेगांव या भागातील चाळीस गावांना याचा मोठा फायदा होणार आहे.
वीट, वंजारवाडी, पिंपळवाडी बरोबर पंचक्रोशीतील गावांमध्ये पिण्याचे पाणी सुद्धा देऊ शकले नाहीत. येथे दुष्काळामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा आम्ही केला आहे. रस्ते केंद्र व राज्य सरकारने केले आहेत. यात लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय केलं? वीट-उमरड रस्ता आणखी तसाच आहे. पाण्याचा प्रश्न तसाच आहे. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी चाळीस गावाला मिळाले पाहिजे. याकरिता आमचें जेष्ठ सहकारी नेते स्व.शहाजी माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. तेव्हा कुठे शासनाने याकरीता सर्वेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. रिटेवाडी उपसासिंचन योजना सुरू करून वीट गावासह चाळीस गावाला हक्काचे पाणी मिळवुन देऊन, शेतकरी समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वीट ते देवळाली रस्ता यांना करता आला नाही. रस्त्यावर साधा मुरुम सुध्दा टाकला नाही. करमाळा तालुक्यात दौरा करीत असताना सभेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कै. नामदेवराव जगताप यांनी शिक्षणाची सोय केली, यांच्यानंतर शिक्षणाची अवस्था बिकट असुन, युवकांना रोजगार आत्मनिर्भर करण्यासाठी एकही व्यावसायिक शिक्षणाची सोय कुणी केली नाही. आम्ही मात्र शिक्षणासाठी देवळाली येथे जागा घेऊन तेथे व्यावसायिक शिक्षणाची सोय करून महाविद्यालय, ज्युनिअर कॉलेज २०२६ पर्यंत सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यात आधुनिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधी शिक्षणाचा विषय काढत नाही, कारण त्यांना पुढे पुढे लाचारी करणारी माणसे हवी आहेत. शिक्षणामुळे आपले जीवन समृद्ध होणार त्यामुळे जातीवर, गटातटाच्या ऐवजी विकासासाठी मतदान करा. बेरोजगारांची समस्या गंभीर असून एम. आय. डी. सी. २९ वर्षाखाली स्थापन झाली, तेथे साधी पाण्याची सोय आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींना करता आली नाही. पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे, जागेचे भाव जास्त असल्यामुळे कुठलेही उद्योग येथे येण्यासाठी तयार नाही. आम्ही पाण्याचे नियोजन करून, जागेचे भाव कमी करून, येथे उद्योग आणुन रोजगारनिर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले . करमाळा तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी २०२२ ला नोकरी महोत्सवाचे आयोजन करुन रोजगार मिळवून दिला असून २०२४ ला रोजगार मेळावा घेऊन ३४४ यूवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. विदयार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ फी भरावी लागते. शैक्षणिक समानतेच्या धोरणावर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह भत्ता मिळवून दिला आहे. आरक्षणाची खरी गरज गरीब गरजू मराठा समाजाला असुन त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचेही सांगितले. शेतकऱ्यांच्या पाण्याविषयी कुणी बोलत नाही. रिटेवाडीचा सर्व्हे साठी निधी मंजूर झाला. त्यात श्रेयवादाची लढाई झाली. शेतकरी बिलासाठी कुणी लोकप्रतिनिधी पुढे आला नाही. असे राजकारणी निवडून दिले तर तेच दिवस पुढे येणार आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, उद्योग, रोजगार निर्मितीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, एक वेळ आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन प्रा.रामदास झोळ सर यांनी केले आहे. वीट गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने जेसीबी वरून फुलांची उधळण करून प्रा. रामदास झोळ सर यांचें भव्य स्वागत करण्यात आले. या सभेला वीट गाव व परिसरातील शेतकरी, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक श्रीकांत साखरे-पाटील यांनी केले. तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…