Categories: करमाळा

रस्ते पाणी वीज याबरोबरच छत्तीस गावांचा सर्वांगीण विकासासाठी निवडुन देऊन काम करण्याची संधी द्या -प्रा.रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी करमाळा माढा मतदारसंघांमध्ये रस्ते, वीज, पाणी याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती करून कुर्डूवाडीसह ३६ गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक वेळ आमदार म्हणून निवडून सेवेची संधी द्यावी, असे मत करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. म्हैसगाव ता.माढा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते . यावेळी जाहीर सभेस व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष सेनेचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, अनुरथ झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ बापू परबत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, बापु गायकवाड, चंद्रशेखर जगताप सर, श्रीकांत साखरे पाटील, मेजर दत्तात्रय पंडित, प्रशांत नाईकनवरे, तुकाराम गवळी, तुकाराम खाटमोडे, हनुमंत गवळी, हनुमंत साबळे उपस्थित होते. या जाहीर सभेत गफूरभाई शेख तालुकाध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग, भगवान डोंबाळे, तालुका संघटक तालुका उपाध्यक्ष आनंद भैय्या झोळ, संभाजी शिंदे तालुकाध्यक्ष पोलीस मित्र संघटना, संजय मामा शिंदे गटाचे करंजे गावातील शहाजी पवार, युवराज वीर, दिवेगव्हाण गावचे तालुका पश्चिम गट कोळी समाजाचे युवा नेतृत्व मिथुन आनंद मोरे, यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रा. रामदास झोळ सर यांना पाठिंबा देऊन झोळ परिवारामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की बेंदऒढ्याचा प्रश्न सोडवला नाही. तर मी निवडणूक लढवणार नाही असे विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणाले होते. आमच्याकडे सुत गिरणी काढतो. ते पण झाले नाही. बेंदवाड्यामुळे १४ गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवला असता. मला निवडून दिल्यास तो प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्तीस गावांमधील रस्ते पाण्याबाबत प्रश्न वर्षानुवर्ष तसेच आहे. तो प्रश्न मार्गी लावणार आहे. कुर्डूवाडी शहरामध्ये जागा मिळाल्यास शिक्षण संकुलाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करणार आहे. आरोग्याच्याबाबतही सर्व सुविधा युक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्याचा मानस आहे. नोकरी महोत्सवाचे आयोजन करून युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळून देणार आहे. करमाळा तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी दिला असे विद्यमान आमदार म्हणत आहेत आणि इकडे ३६ गावांमध्ये आल्यानंतर येथे सर्वाधिक निधी दिला असे सांगत आहेत. मग निधी गेला कुठे? हा प्रश्न जनतेने विचारणे गरजेचे आहे. करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देण्याबरोबरच मकाई, कमलाई, भैरवनाथ, विठ्ठल शुगर्स या साखर कारखान्याकडे अडकलेली बिले आंदोलन करून आम्ही मिळवून दिली आहेत. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सर्व घटकांना बहुजन बांधवांना न्याय देण्यासाठी आपण पाठपुरावा करून मुलींचे शिक्षण मोफत करण्याबरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांनाही इतर समाजाप्रमाणे वस्तीगृह भत्ता मिळून दिला आहे. धनगर समाजालाही एसटी आरक्षणाप्रमाणे सर्व लाभ मिळवून देण्याचे काम केले. शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळण्यासाठी योग्य नियोजन करणे. आपल्या हक्काचे पाणी आपणास मिळाले पाहिजे. ‌‍पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुर्डूवाडी शहरामध्ये व्यावसायिक शिक्षणाची सोय करून एमआयडीसी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करून स्वयंरोजगार मिळून देणार असल्याने कुर्डूवाडी शहर व ३६ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून ‍देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, या निवडणुकीत उभा असलेल्या चार उमेदवारांचा अभ्यास करा. प्रत्येकाला आपण संधी दिली आहे .एक वेळ या माणसाला संधी द्या. या प्रस्थापित उमेदवाराला त्याचा गट तट सांभाळायचा असुन, आपला वारसा टिकवण्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तुमच्या मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विकासाचा दृष्टिकोन असलेले उच्चशिक्षित, सुसंस्कृत अभ्यासू प्रामाणिक सामाजिक भान असलेल्या प्रा.रामदास झोळ सर यांना कुर्डूवाडी शहरासह छत्तीस गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. रामदास झोळ सरांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रा. रामदास झोळ सर यांचे काम नक्कीच प्रेरणादायी असल्याने आम्ही कुर्डूवाडी 36 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना पाठिंबा दिला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पुरूस्कृत केले आहे. एक सुशिक्षित, अभ्यासू, सुसंस्कत नेतृत्वाची विकासासाठी गरज असल्याने छत्तीस गावामधून त्यांना मताधिक्य मिळून घेऊन निवडून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या जाहीर सभेत अजिनाथ बापू परबत जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची भाषणे झाली, शिवाजी भाऊ पाटील जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, दशरथ अण्णा कांबळे, प्रा.रामदास झोळ सर या़ंची भाषणे झाली. हलगी वाजवून प्रा रामदास झोळ सर यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक श्रीकांत साखरे पाटील, यांनी केले तरआभार स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago