Categories: करमाळा

36 गावातून आमदार संजयमामा शिंदे गटाला धक्का नाडी येथील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

करमाळा प्रतिनिधी 36 गावातून संजयमामा शिंदे गटाला धक्का नाडी येथील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश  केला आहे शिवसेना बागल गटात जाहीर प्रवेश करत माढा तालुक्यातील नाडी या गावातील कार्यकर्त्यांनी विद्यमान लोकप्रतीनिधीच्या कार्यशैलीवर नापसंती व्यक्त केली आहे. संजय मामा शिंदे गटाला या सर्वांनी रामराम ठोकला . नुकतेच नाडी गावातील मा.बापू तांबे, मा.सुनिल तांबे, मा.शशीकांत तांबे, मा.आप्पा तांबे, मा.अनिल कोळी या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह करमाळा येथे शिवसेना बागल गटात जाहीर प्रवेश केला.यावेळी प्रदेश भाजपा महिला उपाध्यक्षा रश्मी दिदीसाहेब बागल, भाजपचे युवक मोर्चाचे मा. दिपक चव्हाण, मा. अशोक हनपुडे यांची उपस्थिती होती.महायुतीचे उमेदवार व धडाडीचे युवक नेतृत्व दिग्विजय बागल यांना विधानसभेच्या आगामी निवडणूकीमध्ये निर्णायक मतांची आघाडी घेऊन आम्ही शिवसेना धनुष्यबाणाला अधिकाधिक मते मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.36 गावे आपल्याच हक्काची समजणाऱ्या लोकप्रतिनीधीना ही चांगलीच चपराक बसल्याचे बोलले जात असून मतदार व पदाधिकारी निर्भयपणे पुढे येत आहेत. मतदारसंघातील सर्व तरूणाई बागल यांचे प्रचारासाठी एकटल्याचे चित्र दिसून येत आहे. मा.रश्मी दिदीसाहेब बागल यांनी धन्यवाद व्यक्त करून अभिनंदन केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

14 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

19 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago