Categories: करमाळा

करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ गुरुवारी 14 नोव्हेंबरला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची सभा

करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ गुरुवारी 14 नोव्हेंबरला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे येणार आहेत. त्यांची सभा केम येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दिग्विजय बागल यांनी सोशल मीडिया द्वारे दिली आहे.करमाळा विधानसभेची निवडणूक अत्यंत शिगेला पोहोचली असून मतदारसंघातील चारही महत्त्वाचे उमेदवार संजयमामा शिंदे, नारायण पाटील, दिग्विजय बागल व रामदास झोळ यांचा गावोगावी जोरदार प्रचार सुरू आहे. गावोगावी छोट्या- मोठ्या सभा, पदयात्रा, सोशल मीडिया या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील मोठे नेते देखील प्रचारार्थ हजेरी लावत आहेत.महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचार सभेला आठ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येऊन गेले. त्यानंतर दहा नोव्हेंबरला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील सभेला येऊन गेले. आता 14 नोव्हेंबरला गुरुवारी केंद्रीय केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. गडकरी यांचे भाषण ऐकण्यासाठी जनतेमध्ये उत्सुकता लागलेली आहे.सोशल मीडियावर केलेल्या आवाहनामध्ये श्री बागल म्हणाले की, ही सभा करमाळा मतदार संघासाठी महत्त्वाची असून आपण या मतदारसंघातील प्रश्न गडकरी साहेबांपुढे मांडणार आहोत. त्यामुळे येत्या गुरुवारी सकाळी नऊ वाजता जास्तीत जास्त जनतेने या सभेला उपस्थित राहावे असे त्यांनी आवाहन केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago