Categories: करमाळा

मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रात समावेश करून रस्ते , वीज पाणी शिक्षण रोजगार एम आय डी सी प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक वेळ निवडून द्या- प्रा. रामदास झोळ सर*

*करमाळा प्रतिनिधी
मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून कुकडीचे पाणी कायमस्वरूपी आणण्यासाठी, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी एक वेळ मतदानरुपी आशीर्वाद द्या, असे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. पोथरे ता. करमाळा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, आदिनाथचे मा. संचालक लालासाहेब जगताप, काँग्रेसचे जिल्हा संघटक हरीभाऊ मंगवडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, ओबीसी तालुका अध्यक्ष गफूर शेख, तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, राजुरीचे मा. सरपंच निवृत्ती साखरे, अनिरुद्ध झोळ, श्रीकांत साखरे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, कुकडीचे हक्काचे पाणी कर्जत तालुक्यातील गावांना सोडण्यात येते. हेच पाणी उजव्या कालव्याद्वारे मांगी तलावात सोडल्यास या तलावा खालील मांगी , वीट, मोरवड, पिंपळवाडी, झरे, पुनवर, वडगाव, रावगाव, वंजारवाडी , जातेगाव, हिवरवाडी, भोसे, या गावातील पाझर तलावातुन पोथरे, बिटरगाव, निलज, धायखिंडी, खांबेवाडी, करंजे, भालेवाडी, या गावांना मांगी तलावातुन पाणी पुरवठा होऊन, येथील शेतकरी समृद्ध होऊ शकतो. पाणी प्रश्न बरोबर शिक्षणासाठी देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार आहे. आरोग्याबाबतही करमाळा तालुका मागास असून, ‌सर्व सोयीनिमित्त मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ‌ सुरू करण्याचा मानस आहे. रोजगार निर्मितीसाठी ‌ एमआयडीसी चे काम मार्गी लावून येथे ‌ विविध उद्योग आणून युवकांना रोजगार मिळवून देणार आहे. आतापर्यंत करमाळा शहरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करून माध्यमातूनही ‌आपण ५०० तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. मराठा समाज बरोबर ओबीसी धनगर बहुजन समाज बांधवांना शैक्षणिक सवलती मिळवून दिलेल्या आहेत. शेतकऱ्याचे ऊसाला योग्य भाव ‌शेतकऱ्याची कारखान्याकडे अडकलेली बिले स्वाभिमानी शेतकरी संघटना, दशरथ अण्णा कांबळे यांच्या बरोबर आंदोलन करून मिळवून काम केले आहे. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा सुपुत्र असल्यामुळे मला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न माहित आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर गटातटाच्या, जातीपातीच्या राजकारणात न अडकता एक वेळ मला निवडून द्या. मी नक्कीच करमाळा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून विकास करून दाखवेन, असे मत करमाळा माढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले आहे. वंचित आघाडीची ‌ जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रा. रामदास झोळ सर यांना पोथरे येथील जाहीर सभेत जाहीर पाठिंबा दिला असुन शेतकरी, वंचित, कष्टकरी सर्व समाजाला न्याय देणारे, विकासाची दृष्टी असलेले, रामदास झोळ सर यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.‌‌ यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी करमाळा तालुक्यातील राजकारणाचा लेखा जोखा मांडत म्हणाले की, येथील पुढारी सोयीचे राजकारण करत असून, आपसात सत्तेची वाटणी करून, आपल्या पुढील पिढीचे भवितव्य उज्वल करण्यासाठी धडपड करत आहेत. पुन्हा तुमच्या मुला बाळाची चिंता नाही पण त्यांना भीती आहे की, हे जर‌ शिकले तर आपल्या मागे कोण येणार? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ‌ पाठिंबा देऊन सहकार्य करणारा प्रा. रामदास झोळ सर एकमेव असे व्यक्ती आहेत की, त्यांनी निवडणुकीच्या आधी म्हणून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस पासून ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. आज काही ढोंगी नेतेमंडळी ‌आपणास त्याचा पाठिंबा असल्याचे निवडणुकीच्या निमित्ताने भेटून ‌ सहानभूती मिळवत आहेत. सत्तेत असताना आरक्षणाची स्पष्ट भूमिका न घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. शैक्षणिक समानतेच्या धोरणावर ‌ मराठा, ओबीसी, धनगर, बहुजन समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटी समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती या माणसाने मिळवून दिल्या आहेत. ०८ जीआर शासनाकडून काढून घेऊन मुलींना मोफत शिक्षणाचा जीआर काढण्याचे काम यांनी केले आहे . त्यामुळे मराठा आरक्षण चा प्रश्न ‌ मार्गी लावायचा असेल व सर्व समाजाला शैक्षणिक सवलती मिळून येण्यासाठी झोळ सर यांना पाठबळ देणे गरजेचे आहे.त्यामुळे कै. नामदेवराव जगताप यांच्यानंतर एकही शैक्षणिक संस्था कुणी उभी केली नाही. त्यामुळे आता गट तटाचे राजकारणात भावनिक बोलण्याला बळी पडू नका. ज्यांनी आपल्या तालुक्याचे वाटोळे केले त्यांना आता त्यांची जागा दाखवून करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य रोजगार निर्मिती करण्यासाठी सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू प्रामाणिक नेतृत्व असणाऱ्या प्रा.रामदास झोळ सर यांना रिक्षाचे बटन दाबून विजयी करा ही *रिक्षा* अडीअडचणीतुन बाहेर काढून करमाळा तालुक्याचा विकास करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या सभेसाठी संतोष वाळुंजकर, अशोक जाधव, काशीम शिंदे, तुकाराम खाटमोडे, बाळासाहेब ठोंबरे, विजय झिंजाडे, राज झिंजाडे, आणि झिंजाडे प्रा. आजिनाथ झिंगाडे सर, रमेश आमटे, मारुती लाडाने, विजय शिंदे, दादा शिंदे, जुबेर शेख, संतोष मोरे, रमेश आमटे, गणेश खाटमोडे, परशुराम खाटमोडे, हर्षद खाटमोडे, अंकुश तळेकर, काका पाडुळे, भाऊसाहेब झिंजाडे ,महादेव शिंदे, राजू खाटमोडे यांच्यासह शेतकरी, युवक, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोथरे येथील जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली असून प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असल्याचे या सभेमध्ये झालेल्या गर्दीमुळे दिसून आले. पोथरे येथील सभेचे प्रास्ताविक सूत्रसंचालन श्रीकांत साखरे-पाटील यांनी केले तर आभार गोपीनाथ पाटील यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

7 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

21 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

1 day ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago