घरगुती गॅस सिलेंडर घेताना ग्राहकांनी स्वतः गॅस बुकींग रजिस्टर नंबर वरून बुकींग करणे अतिशय गरजेचे आहे
बुकींग केल्यावर त्यांना बुकींग कन्फर्मेशन व डिलिव्हरी कोड (ओटीपी) एस एम एस येतो हा डिलिव्हरी कोड भारत गॅस डिलिव्हरी स्टाफ सिलेंडर घेताना द्यावा याने सिलेंडर डिलिव्हरी अचूकपणे योग्य त्या ग्राहकाला रजिस्टर होते ही यंत्रणा ग्राहक सुरक्षा व गॅस गैर वापर रोखण्यासाठी आहे.
जर ग्राहकाचा पत्ता हा एजंसी कडे नोंद नसल्यास ओटिपी अनिवार्य असेल व ग्राहकांनी घरपोच डिलिव्हरी साठी आपला पत्ता बदलून घ्यावे.
ग्राहकांनी आपले गॅस पुस्तक स्वतः कडेच ठेवावे. इतर ठिकाणी गावात, दुकानात पुस्तक ठेवले असता, गॅस दुर्घटना झाल्यावर मिळणारा विमा मिळणार नाही तसेच पुस्तकाचा काही गैरवापर झाल्यास त्यास लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी जबाबदार राहणार नाही.
*सुरक्षा तपासणी*
लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी चे अधिकृत गॅस मेकॅनिक व डिलिव्हरी स्टाफ घरोघरी मोफत सुरक्षा तपासणी साठी येत आहेत
ह्या तपासणी अंतर्गत मेकॅनिक आपणास खालील सात विषयावर माहिती देऊन सुरक्षा तपासणी करतील व तसेच आपली शेगडी चे फोटो व आपल्या कडे आलेल्या सुरक्षा कोड(ओटीपि ) घेऊन भारत गॅस कडे ऑनलाईन नोंद करतील.
*सात मुद्दे* –
Q1. Is Customer aware about 1906?
*Q1. 1906 बद्दल ग्राहक जागरूक आहे?*
Q2. Is Cylinder in upright position?
*Q2. सिलेंडर उभ्या सरळ स्थितीत आहे का?*
Q3. Is Hotplate on a platform as compared with cylinder?
*Q3. सिलेंडरच्या तुलनेत हॉटप्लेट (शेगडी)प्लॅटफॉर्मवर आहे का?*
Q4. Is there any crack on the connected Suraksha Hose?
*Q4. जोडलेल्या सुरक्षेच्या नळीला काही क्रॅक आहे का?*
Q5. Is Suraksha hose changed during inspection?
*Q5. तपासणी दरम्यान सुरक्षा नळी बदलली आहे का?*
Q6. Is customer using any other flame device or fuel in same kitchen?
*Q6. ग्राहक त्याच स्वयंपाकघरात इतर कोणतेही फ्लेम उपकरण किंवा इंधन वापरत आहे का?*
Q7. Is the DPR in use of same OMC as Cylinder?
*Q7. DPR सिलिंडरच्या OMC चे वापरत आहे का?*
या सुरक्षा तपासणी अंतर्गत सुरक्षा पाईप खराब अथवा एक्स्पायार झाली असल्यास रुपये 190 रू ची सुरक्षा पाईप
150 रू मद्ये बदलून मिळेल
ही सुरक्षा मोहीम 31 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे इथून पुढे ग्राहकाला सुरक्षा तपासणी साठी 236 रू व सुरक्षा पाईप साठी 190 रू द्यावे लागतील
*मेकॅनिक सेवा*
कोणत्याही प्रकारच्या मेकॅनिक सेवेसाठी लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी च्या *मेकैनिक अधिकृत नंबर – 9527848490* वर कॉल करावे.
या नंबर वर कॉल केल्याने ग्राहकाला वेळेवर व योग्य सेवा देण्याची जबाबदारी लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी यांची असेल.मेकॅनिक सोबत थेट संपर्क साधला असल्यास लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी जबाबदार राहणार नाही गावामधे मेकॅनिक भारत गॅस गणवेश घालून फिरत आहेत कृपया ग्राहकांनी आयडी चेक करूनच अधिकृत गॅस मेकॅनिक कडून गॅस दुरुस्ती सर्व्हिस घ्यावी असे मत वैभव शेंडे यांनी व्यक्त केले आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…