करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांच्या पत्नी सौ.सविता संजयमामा शिंदे,मुलगी यशश्री संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदारसंघात गावोगावी महिलांच्या मदतीने प्रचार दौरा सुरू केला असून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.
आमदार शिंदे यांना करमाळा शहरातून मताधिक्य देण्यासाठी संजय बापू घोलप, गणेश भाऊ चिवटे ,नागेश दादा कांबळे, कन्हैयालाल देवी, प्रवीण आबा जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून ‘होम- टु-होम’ प्रचार करण्यावर भर देण्यात येत आहे. परवा शहरांमध्ये केलेल्या जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर होम टू होम प्रचारावर भर दिल्यामुळे सफरचंद हे चिन्ह घरोघरी पोहोचले आहे .आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारातील या मुसंडीमुळे शहरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे यांनी गावभेट दौरे काढण्यावर भर दिला आहे. रोज सायंकाळी एक सभा व दिवसभर कॉर्नर बैठकांचे त्यांचे सत्र सुरु आहे. नागेश कांबळे, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप व गणेश चिवटे यांच्या पाठींब्यानंतर वातावरण फिरले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून पदयात्रा काढून होम टू होम प्रचार केला जात आहे. याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील प्रचार दौऱ्यात नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी, विवेक येवले, माजी नगरसेवक प्रवीण जाधव, जगदीश अग्रवाल, रितेश कटारिया, अभिषेक आव्हाड, अशपाक जमादार, प्रफुल शिंदे, नाना मोरे, दिग्विजय घोलप, संगीता नष्टे आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…