यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, काँग्रेसचे जिल्हा संघटक हरिभाऊ मंगवडे, राहुल देशमुख, गफूर शेख वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, श्रीकांत साखरे पाटील, अनुरथ झोळ, पांडुरंग झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, उंदरगावचे सरपंच पांडुरंग ताकमोगे, प्रशांत नाईकनवरे, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे , भीम दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले उपस्थित होते. तसेच वांगी गावचे राहुल देशमुख, मोहन सातव, दादा कांबळे शब्बीर पटेल, नारायण देशमुख, अनिल देशमुख, कैलास चौरे, बाळासो जाधव, संदीप शेठ मोरे, मधुकर चौधरी, नामदेव महाडिक, विश्वास देशमुख, विनोद देशमुख, विजय देशमुख, धोंडीराम शिंदे गोरख मोरे, अलम पटेल, आबा सातव आवर्जून उपस्थित होते. प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, करमाळा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. वांगी चा रस्ता तर अत्यंत खराब रस्ता आहे. या निवडणूकीत जे प्रस्थापित उमेदवार उभे आहेत. स्वतःला रोडकिंग आमदार म्हणवतात त्यांनी रस्ते का केले नाह? पाणीदार आमदारांनी उजनी ६१% टक्के असताना मायनस झाल्यावर शेतकऱ्याचे नुकसान झाले. याबाबत त्यांनी काय केले? याचा जाब जनतेने विचारणे गरजेचे आहे. आतापर्यत पाणी, रस्ते, पाणी यावर मते मागितली. ती कामे का झाले नाही? गटातटाच्या राजकारणामुळे वाटोळे झाले आहे. त्यांना कोणतेच कामे करता आली नाहीत. शिक्षण, आरोग्य, रोजगार यावर आपण
काम करणार आहे. शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. उजनी धरणाचे पाणी शेतीसाठी योग्य नियोजन करण्यासाठी समांतर जलवाहिनी का केली नाही?उजनीचे पाणी वाचविण्यासाठी सोलापुरपर्यत समांतर जलवाहिनी काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. याकरिता सोलापुर जिल्ह्यात काम करावे लागणार आहे. गाळ, वाळु उपसा करणे गरजेचे आहे. यामुळे २५ टीएमसी पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. मराठ्यावाड्याला जाणाऱ्या बोगदा उंची वाढवणे गरजेचे आहे. झिरोच्या वर उंची ठेवून शेतकरी धरणग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देणार आहे. उजनी मायनस मध्ये गेल्यावर लोक प्रतिनिधीने काय केले?उजनीत वरील 19 धरणातून दहा टीएमसी पाणी सोडण्यासाठी आंदोलन करणे आवश्यक होते. जायकवाडी धरणात ज्याप्रमाणे सोडले होते, याप्रमाणे उजनी धरणात पाणी सोडावी अशी मागणी केल्यावर ती तुमच्या लोकप्रतिनिधीची चुक आहे. असे सांगून त्यांनी नियोजन न केल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उजनीचे बारमाही पाण्याचे नियोजन करण्यासाठी निरा भिमा कालवा झाला असता तर निरेचे पाणी उजनीमध्ये आले असते. रस्त्याचा विषय बघितला तर रोडची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आम्ही कुठलेही अधिकार नसताना पद नसताना काम केले आहे. शिक्षण रोजगारामुळे करमाळा तालुक्यातील युवकांची बेरोजगारीमुळे लग्न रखडली आहेत. एमआयडीसीचे काम अद्याप पर्यंत झाले नाही. एकोणतीस वर्षात यांना साधे पाणी आणता आले नाही. इंदापूरची एमआयडीसी झाली पण आपल्या एमआयडीसी उद्योगा अभावी बंद आहे. जागेचे भाव पण अधिक असल्यामुळे आपण देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार आहे. “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे केत्तुर १ येथे बालवाडी ते बारावी शिक्षण सोय केली असून फार्मसी डिप्लोमा लवकरच सुरू केले.
नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून रोजगार मेळावा घेऊन नामांकित कंपन्यांना आमंत्रित करून युवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. पाचशे तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. रासायनिक खतांमुळे पाणी प्रदूषित झाले. कोवीडमुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर सर्व सोयींनी युक्त करमाळा शहरात हॉस्पिटल होणें गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन चार वर्षांत सर्व डॉक्टरांना बरोबर घेऊन सर्व सुविधायुक्त प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्यावतीने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केळीसाठी राहुरी कृषी विद्यापीठ केंद्र मंजूर असताना हे केंद्र दुसरीकडे नेण्याचा घाट घातला जात असून करमाळा येथील वांगी येथेच केळी संशोधन केंद्र उभा करुन स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणार असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. दोन्ही कारखाने बंद पडल्यामुळे दोन अडीच हजार लोक बेरोजगार झाले. बचाव समितीतुन आम्ही तीन वर्षानंतर शेतकरी सभासदाकडून पैसे गोळा करून आदिनाथ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. आदिनाथकारखाना सुरू केला, यशस्वीपणे 80 हजार गाळप केले. शेतकरी बांधवांना आदिनाथ, मकाई, कमलाई, भैरवनाथचे बिल आंदोलन करून, आचारसंहिता लागल्यानंतर न्यायालयात जाऊन न्याय मिळवून दिला आहे. यावेळी लोकप्रतिनिधी कुठे गेले होते? याचा जाब जनतेने विचारणे गरजेचे आहे. राजकारणात भांडणे केलेली माणसे एकत्र आली. मार्कट कमिटीला सर्वजण आपसातील मतभेद भांडण विसरून सत्तेसाठी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. राजकीय वारसा जपण्यासाठी सत्तेसाठी प्रत्येकाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत यामध्ये सत्ता हवी आहे. लोकसभेप्रमाणे जनतेनी ही निवडणूक हातात घेतली आहे. विकासाचे माॅडेल घेऊन मी निवडणुकीसाठी आपल्या विकासासाठी उभा आहे. प्रस्थापित उमेदवाराना बाजुला सारा मराठा, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी मी काम केलं असुन यापुढेही करत राहणार आहे. पंढरपूर येथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपण पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मनोज जरा़गे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष सहभागी होऊन पाठिंबा देऊन काम केले आहे. विधानसभा लागली की उमेदवार निवडणूकीला उभे राहिले की मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले. त्यांना मी जागेवर पकडले. आपण सत्तेत असताना का आवाज उठवला नाही? असा प्रश्न त्यांना केला. स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये निवडून येण्यासाठी यांची धडपड चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आपण मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम, बहुजन बांधवांना शैक्षणिक समानतेच्या धोरणावर शैक्षणिक सवलती मिळवून देण्याचे काम केले आहे. शासनाकडून आतापर्यंत ०८ जीआर काढले आहेत. मराठा, धनगर आरक्षणासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या जाहीर सभेमध्ये केम, वडशिवणे, निंभोरे येथील कार्यकर्त्यांनी झोळ परिवारात प्रवेश केला आहे. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे म्हणाले की, वांगी गावच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून लोकप्रतिनिधीच्या वरदहस्तामुळे वाळु चोरण्याचा कार्यक्रम रात्री जोरात चालू आहे. त्यामुळे यांना रस्त्याचे काही पडले नाही. आमच्या एखाद्या माणसाला अटैक आला तर, रस्त्यामुळे त्याचा बळी जाऊ शकतो. तसेच माय माऊली प्रसूती मध्ये या रस्त्यामुळे बाळंत होऊन बाळाचा किंवा आईचा जीव जाऊ शकतो. याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आपल्या कार्यकर्ते पोसण्याचे काम करत आहेत. दहशतीचा प्रकार वाढत चालला आहे. एक पिढी आत्तापर्यंत बरबाद झाली आहे. छत्रपती शिवाजी महारजाचे आम्ही वारसदार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मराठा आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य संकल्प उभा करणाऱ्या शिवबाचे शिलेदार आहोत. त्यामुळे हिम्मत न हरता परिवर्तनाच्या या लढाईमध्ये सहभागी होऊन विकासाला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. कै नामदेवराव जगताप यांनी उजनी धरण उभा केले. करमाळा तालुक्यातील मुला-मुलीसाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी, महात्मा गांधी विद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय उभा कले. जेऊर येथे भारत हायस्कूल ज्यांनी सुरू केले त्यांच्याकडून हाणण्याचे काम नेत्यांनी केले आहे. आम्ही छत्रपतीचे नाव घेऊन काम करतो. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायची आमची लायकी नाही. विधानसभेची निवडणूक आहे. रामायण महाभारतच्या गोष्टी सांगितल्या जातात. येडे कोण आहेत? याचा विचार सुज्ञ नागरिकांनी करणे गरजेचे आहे. सुतगिरणी गारमेंट सुरू करणार म्हणाली होते. त्याची काय झाले?रोडकिंग आमदार म्हणून घेणाऱ्यांना तालुक्यातील रस्ते का चांगले केले नाहीत? पाणीदार आमदार कुठे गेले होते? ज्यावेळेस उजनी मायनस मध्ये गेल्यावर पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चाऱ्या खोदून पिके वाचवण्याची वेळ आली. काही आजची पिके गेली याबाबत का कुणी उपायोजना नियोजन केले नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. करमाळा तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई झाली असताना प्रा. रामदास झोळ सर यांनी स्वतःच्या खर्चातून टँकरने ग्रामस्थांना मागेल त्याला गावात पाणी पुरविले. नवरात्र उत्सवानिमित्त देवदर्शन घडवले, ग्रामीण भागात जेष्ठना बसण्यासाठी, युवक पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी बाकडे वाटप केले आहे. जातिपातीच्या, गटातटाच्या राजकारणात आमचे काय केले? याचा विचार करण्याची आता हिच खरी वेळ आहे . स्वर्गीय कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या नंतर नारायण आबांनी कारखाना वाचविण्यासाठी काय केले. स्वतः संचालक पदाचा सहा संचालक राजीनामा देऊन पळुन गेले. आदिनाथचे वाटोळे केले. आदिनाथचे ऐंशी महिन्यांची पगार थकलेली आहे. यामधुन सात कोटी रुपये प्रत्येक व त्यामागे सहाशे रुपये प्रमाणे देतो असे आश्वासन दिल्यानंतर नंतर साखर बाहेर काढली आहे.ज्यांनी आमचे प्रपंचाचे वाटोळे केले त्यांना निवडून देणार आहात का? मकाई का बंद आहे? गटातटाचे घराणेशाही यांनी चालवली आहे. प्रा.रामदास झोळ सर मकाईचे पॅनल उभा करताना लालासाहेब जगताप सर यांना घेऊन माझ्याकडे आले. त्यावेळी विधानसभा लढवण्याची वचन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेण्यास सांगितले. मी माथाडी कामगारांचा मुलगा आहे. जगताप गटच सर्व नेते मंडळीची नर्सरी आहे. सोलापुर जिल्हयात फक्त जगताप गट व मोहिते पाटील गट होते. कै नामदेवराव जगतापाच्या तालमीत मी घडलो. पोलिंग एंजट म्हणून जयवंतराव जगताप यांच्याबरोबर गेलो होतो. त्यावेळी झालेल्या मारामारी मध्ये सुदैवाने मी त्यांचे वाचवले त्याच नारायण आबांना भाऊंनी आता पाठिंबा दिला आहे. प्रिन्सवर मार्केट कमिटी सभापती निवडणुकवेळी हल्ला झाला होता. ही आपसात हार्डवैर असणारी मार्कट कमिटीला अकलुज एकत्र आली. नालबंद मंगल कार्यालयात मेळावा घेऊन धैर्यशील मोहिते यांनी निवडुंन दिले. भविकासाच्या नावाखाली आतापर्यंत गटातटाच्याच्या ,जातीपातीच्या राजकारणाला वाव देण्याचे काम केले आहे. याचा डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. शिक्षणाची सोय नाही. दवाखान्याची सोय नाही. येथे यांच्या नेते मंडळींनी अकलूज बारामतीचे नंदनवन केले. त्या माणसाने आमच्या साठी काय केले? मते मागण्या पुरते ती येतात मग त्यांनाही तुम्ही तुमच्या माणसाने काय काम केले नाही. तुम्ही ती केली पाहिजे असा सवाल करणे गरजेचे आहे . जोपर्यंत आम्ही गटतट सोडत नाही तोपर्यंत आमचा विकास होणार नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठा महासंघाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी आत्महत्या करून आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे आता प्रस्थापित मराठ्यांच्या नादाला न लगता गरजवंत मराठ्यांच्यी साथ देणाऱ्या प्रा. रामदास घेऊन सर यांना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मितीसाठी एक वेळ निवडून सेवा करण्याची संधी द्या अशी आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी केले आहे. वांगी नंबर २ येथे झालेल्या जाहीर सभेला शेतकरी, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रास्ताविक सूत्रसंचालन श्रीकांत साखरे पाटील यांनी केले तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा नेते गणेश मंगवडे यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…