कै. नामदेवराव जगताप यांनी महात्मा गांधी विद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या शिक्षण संस्थेची उभारणी केली. मात्र त्यानंतर कुठलेही नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी शिक्षण संस्था उभी न केल्यामुळे शिक्षणाबाबत करमाळा तालुका मागास राहिला असून, शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते त्यांचे जीवन समृद्ध होते. त्यामुळे आपण करमाळा शहरा जवळ देवळाली येथे २० एकर जागा घेतली असून २०२६ पर्यंत व्यवसायिक शिक्षणासाठी शिक्षण संकुल उभा करणार आहोत. रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मांगी येथील एमआयडीसीत पाण्याची सोय करून मोठमोठे उद्योग आणून एमआयडीसी सुरू करून युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देणार आहे. तरी आपण करमाळा शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गटातटाचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा असे आवाहन प्रा. रामदास झोळसर यांनी केले. करमाळा शहरात सुभाष चौक येथे आयोजित प्रचार जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील, आदिनाथ कारखान्याचे मा. संचालक लालासाहेब जगताप सर, अनुरथ झोळ वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, सौ मायाताई झोळ मॅडम, सौ.भाग्यश्री गरड मॅडम, श्रीकांत साखरे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, चंद्रशेखर जगताप, रिधोरेच्या सरपंच उर्मीलाताई शिंदे, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, प्रशीत बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, कल्याण महाराज खाटमोडे, जैन्नुद्दीन शेख, राजुरीचे माजी सरपंच निवृत्ती साखरे, राजुरीचे मा. सरपंच दादा बापू साखरे, कल्याण दुरंदे, रघुनाथ मोरे, गणेश जाधव, नवनाथ बापू साखरे, Adv.नानासाहेब बागल, पांडुरंग ताकमोगे, व पत्रकार बंधू आवर्जून उपस्थित होते. या जाहीर सभेमध्ये दिवेगव्हाण येथील सुनिल रोडे, रघुनाथ मोरे, सतीश सुपेकर, साहेबराव वाघमारे यांनी झोळ परिवारात प्रवेश करून पाठिंबा दिला आहे. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले की, आतापर्यंत जेवढ्या विधानसभा निवडणूका झालेल्या आहेत त्यापेक्षा ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे. कारण या निवडणुकीमध्ये एक नवीन वेगळा चेहरा आपल्यासमोर आहे. करमाळा मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर २००९, २०१४, २०१९ ला जे उमेदवार होते, त्यांच्या घरातील आमदार होऊन गेले. त्यांच्या घरातीलच माणसें पुढे निवडणूक लढवत आहेत. आत्ता २०२४ मध्ये तेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर मी एक शेतकऱ्याचा मुलगा एक पर्याय म्हणून त्यांच्यासमोर उभा आहे. मी अचानक आलो नाही. गेली वीस पंचवीस वर्षांपासून काम करत आहे. पुणे जिल्ह्यातील स्वामी-चिंचोली भिगवण येथे दत्तकला शिक्षण संस्था स्थापन करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्याचे काम केले आहे. या संस्थेमध्ये व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५००० असुन १५००० विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन रोजगार मिळाला आहे. लोकप्रतिनिधी रस्ते, पाणी, वीज यावर मतदान मागत आहे. विकासासाठी कुठलेही धोरण त्यांच्याकडे नाही. तेच उमेदवार उभे आहेत. गटाच्या तटात राजकीय सत्तेची वाटणी करून दिशाभूल केली आहे. मागील उमेदवारांनी काय केले? तेच उमेदवार तेच विषय आहेत. मी यावेळी उभा असुन करमाळा शहरात शैक्षणिक व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. यामध्ये शिक्षण घेऊन मुलें-मुली इंजिनीअर्स, फार्मसिस्ट, आर्किटेक्चर्स होणार आहे. शिक्षणामुळे आर्थिक समृद्धी होणार असुन बाजारपेठ मोठी होणार आहे. एमआयडीसी प्रश्न तसाच आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी येथे उद्योग आणून एमआयडीसी सुरू करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामती, अकलुज इंदापूर प्रमाणे करमाळा शहर सर्व सुविधायुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या लोकप्रतिनिधीने साखर कारखाना विकला. करमाळयात नेतेमंडळींनी गटातटाच्या राजकारणात आदिनाथ, मकाई कारखाने बंद पाडले. दोन तीन अडीच हजार रोजगार बुडाले. मांगीतील एमआयडीसी बंद आहे. असे काम लोकप्रतिनिधी असेल तर काय होणार? बार्शी तालुका शैक्षणिक संस्था, शिक्षणामुळे विकसीत झाला आहे. शिक्षणातुन करमाळा तालुक्यात विकास करण्यासाठी देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार असून रोजगारनिर्मिती करणार आहे. करमाळा शहरामध्ये आरोग्य बाबत करमाळ्याची परिस्थिती बिकट असून, एखाद्या व्यक्तीला अटॅक आला तर त्याला सोलापूर, बार्शी, पुणे, नगरला जावे लागते. त्याकरिता आपण तज्ञ डॉक्टरांना बरोबर घेऊन करमाळा शहरामध्ये झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून मोठे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करणार आहे. त्यामुळे करमाळा शहर तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार याकरिता मला आपण *रिक्षा* चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजयी करून सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी केले आहे. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, घराणेशाही, गटातटाच्या, राजकारणामुळे आमचे वाटोळे झाले असुन, निदान पुढच्या पिढीसाठी भावनिक न होता डोळसपणे विचार करून मतदान करण्याची गरज आहे. मार्केट कमिटीत निवडणुका वेळी भांडण करणारे सत्तेसाठी एकत्र आले. जेऊर येथे तलवारीने मारामारी करणाऱ्यानी एकामेकांना राजकारणातील सत्तेसाठी पाठिंबा देऊन सत्तेची वाटणी आपसात करण्याची काम केले आहे. करमाळा माढा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीने कामे केले असते, तर त्यांना बायका, मुलं, सुनेला घेऊन फिरायची गरज का पडली?०५ वर्षे निवडुन दिले तुम्हाला, रस्त्याचे पण काम करता आले नाही. निवडणुक झाल्यावर आम्हाला भेटत सुध्दा नाहीत. आपली पिढी शिक्षीत झाली पाहिजे. सुशिक्षित उमेदवार निवडून दिला पाहिजे. लाडकी बहिण योजना दिड हजार आपणास पुरणार का? आता मुलांना आता भत्ता चालू करणार आहे. त्यामुळे आमची मुले कधीच सुधारणार नाही. उलट गुन्हेगार, व्यसनाधीन, नक्षलवादी होणार आहेत. आमची पिढी शिक्षीत करायची असेल तर प्रा. रामदास झोळ सर या माणसाशिवाय पर्याय नाही. करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच शिक्षण, आरोग्य, रोजगार यांची चर्चा झाली आहे. बारामती, अकलुज सुधारले आमच्या तालुक्याच्या विकासासाठी आपण काय केले? राजेशाही संपली, लोकशाहीत घराणेशाही सुरू झाल्या. कै. नामदेवराव जगताप यांनी शिक्षणाची सोय केली, उजनी धरण करमाळा तालुक्यात आणणारे महाराष्ट्राचे नेते होते. त्यांच्या नंतर मात्र कुणीही विकासाचे काम केले नाही . स्व गणपत आबा देशमुख यांनी जसा सांगोल्याचा विकास केला. त्यांच्या प्रमाणेच झोळ सर यांना आपण साथ द्या. *रिक्षा* कुठेही जाते आपणास ते साथ द्या. मराठा समाजासाठी आरक्षण लढ्यासाठी ते सुरुवातीपासून लढत आहे. प्रस्थापित नेते मंडळी सोयीचे राजकारण करत असून आपसात सत्तेची वाटणी करून आपल्या पुढील पिढीचे भवितव्य उज्वल करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना तुमच्या मुला बाळाची चिंता नाही. पण त्यांना भीती आहे की, हे जर शिकले तर आपल्या मागे कोण येणार? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहकार्य करणारा प्रा. रामदास झोळ सर एकमेव असे व्यक्ती आहेत की, त्यांनी निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळेस पासून ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. शैक्षणिक समानतेच्या धोरणावर मराठा, ओबीसी, धनगर, बहुजन समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटी समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती या माणसाने मिळवून दिल्या आहेत. ०८ जीआर शासनाकडून काढून घेऊन, मुलींना मोफत शिक्षणाचा जीआर काढण्याचे काम यांनी केले आहे. त्यामुळे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल व सर्व समाजाला शैक्षणिक सवलती मिळून येण्यासाठी झोळ सर यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. करमाळा शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना रिक्षा चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावे, असे आवाहन बहुजन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले की, मागील विधानसभेला आमच्या पाठिंबावर संजय शिंदे निवडून आले पण त्यांनी आमचे एकही काम केले नाही, त्यामुळे यंदाच्या विधानसभेला आम्ही प्रा. रामदास झोळ सर यांना पाठिंबा दिला असून, त्यांना कुर्डूवाडी व छत्तीस गावांमधून मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. या सभेमध्ये सिध्देश्वर घुगे, सौ मायाताई झोळ मॅडम, जैनुद्दीन शेख, प्रशांत बागल, खाडे मॅडम यांची भाषणे झाली. करमाळा शहरातील ऐतिहासिक अशा सुभाष चौकामध्ये या सभेसाठी नागरिक युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक श्रीकांत साखरे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…