Categories: करमाळा

करमाळा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मला निवडून देऊन सेवेची संधी द्यावी-आमदार संजयमामा शिंदे.

करमाळा प्रतिनिधी
विकास ही चिरंतन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.या प्रक्रियेमध्ये 2019 ते 24 मध्ये मी माझ्या परीने योगदान दिले. सर्वच विकास कामे पूर्ण झाली असं नाही परंतु जो काळ मला मिळाला त्या काळामध्ये पायाभूत विकास करण्याचे काम मी केले असून इथून पुढच्या काळामध्ये तालुक्याला औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ओळख निर्माण करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणे हे आपले उद्दिष्ट आहे असे आमदार संजयमामा शिंदे यांच्या जाहीरनाम्यामधून स्पष्ट होत आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार आमदार संजयमामा यांनी जाहीरनाम्यात करमाळा शहराच्या हद्दवाढीसह नवीन विकास आराखडा , शेती, वीज, आरोग्य व शिक्षण य घटकावर भर दिला आहे. करमाळ्यात केळी संशोधन केंद्र सुरु करणे व कृषी महाविद्यालय सुरु करण्याचा मानस आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. करमाळ्यातील ११८ व माढा तालुक्यातील ३६ गावांमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. ‘२०१९ ते २४ दरम्यान केलेल्या विकास कामांमुळे माझ्यावर मतदारांचा विश्वास आहे. नेते एका बाजूला आणि मतदार एका बाजूला अशी स्थिती असून ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे’, असे आमदार शिंदे यांनी एका सभेत स्पष्ट केले आहे.

‘करमाळ्यातील मतदाराच्या विश्वासास पात्र राहून मी येणाऱ्या काळात काम करणार आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून मी करमाळ्याला निधी देतो आहे. विकास काम करताना कधीही राजकारण केले नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी काम केले आहे. तो विरोधक असो की माझा.विकास कामात मी कधीच राजकारण केले नाही असे ते म्हणाले. येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये आ.शिंदेचे पुढील गोष्टींना प्राधान्य राहील…
१) कुकडी उजनी योजना सुरु करण्यासाठी काम प्रयत्न करणार असून या माध्यमातून ४० गावातील २४ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणणार आहे.
२) दहिगाव उपसा सिंचन योजने चे काम बंद नलीकेतून होत आहे. त्यामुळे बचत होणाऱ्या पाण्यातून नवीन समाविष्ट करण्यासाठी १२ गावांचा सर्व्हे करून बंद नलिकेतून पाणी देण्यावर भर राहणार
३) मराठवाड्याला पाणी जाणाऱ्या बोगद्याच्या ९ शॉफ्टद्वारे पाणी उचलण्याची परवानगी मिळवण्यावर भर देणार
४) सीना माढा उपसासिंचन योजनेचे पाणी बेंद ओढ्यात सोडले जाणार
५) सौन्देत १३२ केव्ही वीज उपकेंद्र उभारणार व सावडीत ७६५ केव्ही वीज उपकेंद्र उभारणार
६) करमाळा शहरात नवीन पाणी पुरवठा योजना केली जाणार. नवीन विकास आराखडा तयार केला जाणार व विस्तारीकरण केले जाणार.
७) मांगी एमआयडीसी येथे पाणी पुरवठा योजना सुरु करणे व येथे नामांकित कंपन्या आणून रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago