Categories: करमाळा

आजची तरुण पिढी उद्याचे देशाचे भवितव्य असून ‌ युवक कल्याणासाठी ‌ महिला सुरक्षिततेसाठी ‌ शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी सर्वांगीण विकाससाठी ‌ नारायण आबा पाटील यांना विजयी करा- ना. शरदचंद्रजी पवार ‌

करमाळा प्रतिनिधी आजची तरुण पिढी उद्या देशाचे भवितव्य असून ‌ युवक कल्याणासाठी ‌ महिला सुरक्षिततेसाठी ‌ शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी सर्वांगीण विकाससाठी ‌ नारायण आबा पाटील यांना विजयी करा ‌ असे आवाहन आवाहन देशाचे नेते‌ माजी ‌ केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ‌ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या प्रचारार्थ महात्मा गांधी विद्यालय ‌ करमाळा येथे आयोजित सभेत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप ,अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज होळकर महाराज ,सुभाष आबा गुळवे, नवनाथ बापू झोळ,वैभवराजे जगताप ,शंभूराजे जगताप, सुनील सावंत सवितादेवी राजेभोसले ,देवानंद बागल, ॲड राहुल सावंत , काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप,अतुल भाऊ पाटील शिवसेनेचे प्रवीण कटारिया ,पृथ्वीराज पाटील,राजाभाऊ कदम, संतोष वारे, सुवर्णा शिवपुरे नलिनी जाधव उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नामदार शरदचंद्र पवार म्हणाले की लोकसभेमला ‌आपण महाविकास आघाडीला ‌ भरघोस मतांनी निवडून दिले ‌. लोकशाहीमध्ये मतदानाची ताकद मोठी असून ‌ यामुळे ‌ व्यवस्था बदलण्याची ताकद ‌ तुमच्या मतामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यामध्ये कै. नामदेवराव जगताप माळशिरस तालुक्यात कै शंकरराव मोहिते पाटील यांचेच वर्चस्व होते .करमाळा तालुक्याचे ‌ भाग्यविधाते कै. नामदेवराव जगताप ‌ यांनी तालुक्यातील मुला मुलींसाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी महात्मा गांधी विद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ‌ सुरू केले मात्र त्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी हे काम केले नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ‌ यांचे कै . नामदेवराव जगताप यांचे मानसपुत्र होते .सुपुत्र माजी आमदार जयवंतराव जगताप चिरंजीव वैभवराव जगताप शंभूराजे जगताप ‌ त्यांचा वारसा यशस्वीपणे चालवत आहेत.मागील विधानसभेला ‌ माझ्यामुळे तुम्ही संजय मामा शिंदे यांना निवडून दिले मात्र त्यांनी कुठलीही विकास कामे केली नाही. त्यामुळे त्यांना अपक्ष उभारण्याची वेळ आली आहे. तरुण ही राष्ट्राची शक्ती असून ‌ आपल्या सभेला तरुणांचा उस्फुर्त सहभाग लावत आहे त्यामुळे तरुणांसाठी उच्च शिक्षणाची सोय याबरोबरच नोकरी रोजगार यासाठी सत्ता मिळाल्यानंतर नक्कीच आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांना उद्योग रोजगार पासून वंचित ठेवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. महाराष्ट्र राज्यामध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे . शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत . पण सरकारने‌‌ संपूर्ण ‌ कर्जमाफी केली नाही . मी कृषिमंत्री असताना 70 हजार कोटी कर्ज माफ केले आहे आमची सत्ता आल्यानंतर ‌ शेतकऱ्याचे ‌ संपूर्ण कर्ज माफ करणार करणार आहे .तर महिलावर रोज अत्याचार होत असून 67 हजार 382महिलांवर अत्याचार झाल्याचा अहवाल आहे. जेथे महिला सुरक्षित नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचा काय उपयोग. शेतकरी युवक सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून ‌ महागाई वाढून ‌ योजना राबवून याचा काही उपयोग होणार नाही. यासाठी महागाई कमी करून ‌ सर्वसामान्य ‌ लोकांचे जीवन कसे सुक्कर करता येईल ‌ याकरता महाविकास आघाडी कटिबद्ध राहणार आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नारायण आबा पाटील ‌ यांच्या पाठीशी पाबबळ देऊन ‌ बहुमताने विजयी करा ‌ करमाळा तालुक्यातील ‌ सर्व प्रश्नांची सोडवणूक करून दिलेल्या संधीचे नक्कीच ते सोने करून दाखवतील असा विश्वास ‌ देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लोकनेते नारायण आबा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की करमाळा शहरामध्ये उच्च शिक्षणाची सोय करण्याबरोबर व्यावसायिक शिक्षण सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून युवकांच्या तरुणांच्या हातांना काम देण्यासाठी ‌ एमआयडीसी ‌ लवकरात लवकर उद्योग आणून ‌ सुरू करण्याचा आपला मानस आहे. करमाळा तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन नारायण आबा पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ‌ नारायण आबा पाटील ‌ यांच्या प्राचार्य अर्थ सभेत बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले की शरदचंद्रजी पवार हे आपले दैवत असून ‌ पवार साहेब जेवढ्या वेळी करमाळ्याला आले त्यावेळी तो करमाळ्याचा उमेदवार आमदार झाला आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः त्यानंतर शामलताई बागल मागच्या वेळी संजय मामा शिंदे आमदार झाले असून नारायण आबा आता तू नक्कीच आमदार होणार असून तुझा विजय निश्चित असल्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सुनील तळेकर यांनी केले. महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे आयोजित जाहीर सभेला शेतकरी युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago