करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका गटातटाच्या राजकारणामुळे मागे राहिला असून रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार याबाबतही कुठल्याही प्रकारची काम झाले नाही. त्यामुळे गटातटाच्या राजकारणाला, घराणेशाहीला गाडुन सर्वांगीण विकासासाठी एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या. असे आवाहन प्रा रामदास झोळ सर यांनी केले. करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभेला व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा संघटक हरिभाऊ मंगवडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, अनुरथ झोळ ,वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, पांडुरंग खाटमोडे दाजी, श्रीकांत साखरे पाटील, आनंद झोळ पोलीस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, भिमराव ननवरे संजय जगताप सर उपस्थित होते. पुढे बोलताना झोळ सर म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून आपण करमाळा तालुक्यामध्ये काम करत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मागील १२ दिवसात १५४ खेड्यांना भेट दिल्यानंतर जाणवले की येथील रस्ते, पाणी, वीज प्रश्न अद्यापही संपले नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेआहे. दळणवळणाची सोय नसल्यामुळे उद्योग व्यवसायांनाही येथे वाव मिळत नाही. एमआयडीसी चालू नसल्याने येथे उद्योग व्यवसाय नसल्यामुळे युवकांना पुणे मुंबईला कामाला जावे लागत आहे. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून व्यावसायिक शिक्षणाची सोय नसल्याने ही समस्या भेडसावत आहे. धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असुन पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने उजनी असताना त्याचा पूर्ण लाभ येथील शेतकरी नागरिकांना मिळत नाही. करमाळा शहरातही पाण्याची समस्या असून चार-पाच दिवस पाणी येत नाही मग राजकर्त्यांनी काय काम केले? याचा प्रश्न जनतेने विचारणे गरजेचे आहे. कोट्यवधी रुपये निधीचा विकास केला मग तो विकास गेला कुठे? रस्ते नाही, पाणी नाही, शिक्षणाची, आरोग्याची, रोजगाराची, उद्योग व्यवसायाची कुठलीही कामे यांनी केली नाही. तरी विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहेत. दरवेळी तीच मंडळी मते मागण्यासाठी येत आहेत. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये पारंपारिक तेच घराणेशाही उमेदवार आहेत. यंदाच्या प्रथमच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी पुत्र या नात्याने मी निवडणूक लढवत आहे. करमाळा तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर रस्ते, पाणी, याबरोबरच वीजेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतीसाठी पूर्णवेळ वीज देणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार याविषयी काम आम्ही करणार आहोत. प्रस्थापित नेतेमंडळींना विकास कामे जर केली असती तर मोठमोठ्या नेत्यांना सभेला का आणावे लागले असते?शेतकऱ्यांचा जर यांना खरंच कळवळा असला असता तर आदिनाथ मकाई कारखाने चालू केली असते. एमआयडीसी २९ वर्षे झाले स्थापन होऊन ती आद्यपही चालू झाली नाही. याविषयी कोण बोलणार आहे. आम्ही दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भिगवणसह केत्तुर ठिकाणी व्यावसायिक शिक्षणाची सोय केली आहे. मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक समानतेच्या धोरणावर शैक्षणिक सवलती मिळवून देण्यासाठी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून त्यांच्याबरोबर काम करत आहे. फक्त आरक्षणासाठी नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सवलती उपलब्ध करून देण्यासाठी ०८ जीआर शासनाकडून काढले आहेत. यामध्ये मुलांना वस्तीगृह भत्ता, ओबीसी समाजाला लाभ मिळवून दिला आहे. सर्व समाजाला,१५५४ अभ्यासक्रमाना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे काम केले आहे. जातीनिहाय शैक्षणिक सवलती, ओबीसींना जातपडताळणी सहा महिने मुदतवाढ, मेडिकल शिक्षणाची मोफत शिक्षण जीआर काढले आहेत. बेरोजगारीचा विषय गंभीर असून कै. तत्कालीन आमदार रावसाहेब पाटील यांनी स्थापन केलेली एमआयडीसी यांना चालू करता आली नाही. याबाबत एकानेही तेथे काय केले नाही. शिक्षण संस्थेसाठी जागा घेण्याचा आपला विचार होता, परंतु जागेचे भाव अधिक असल्यामुळे देवळाली येथे कमी भावात जागा मिळाली आहे. तेथे 2026 पर्यंत व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक संकुल उभा करणार आहे. शिक्षणाची सोय सुरू होण्यापूर्वी रोजगार निर्मितीसाठी रोजगार मेळावा घेऊन पाचशे युवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. करमाळा तालुकयात आरोग्यविषयी काम करणे गरजेचे आहे. आपल्या एका जेष्ठ नेत्याला ॲटक आल्यावर बार्शीला जावें लागलें होतें. त्यामुळे कुणालाही बारामती, पुणे, सोलापूर, अहमदनगर येथे जाण्याची गरज भासू नये, म्हणून करमाळा शहरालगत तालुक्यातील डॉक्टरांना सहभागी करून दोन तीन वर्षात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, दशरथ अण्णा कांबळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला असुन, मकाई, आदिनाथ, कमलाई, भैरवनाथ, विठ्ठल शुगर्सचे पैसे मिळवून देण्यासाठी आंदोलन केले. आचारसंहिता लागल्यावर न्यायालयात जाऊन न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यावेळी एका लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेतला नाही. मकाईचे छत्तीस कोटी मिळवून दिले आहे. त्यामुळे आता कुठल्याही कारखान्याला चौदा दिवसानंतर बिल देणे बंधनकारक असणार आहे. २०१६ ला दुष्काळ पडल्यावर व यावर्षी मागेल त्याला पाणी टँकरने दिले आहे. नेते त्यांच्या राजकीय फायद्यासाठी युती करत आहेत. दुष्काळ परिस्थितीत उजनी मायनस मध्ये गेल्यावर वरील धरणातून उजनीत दहा टीएमसी पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले होते, त्यावेळी एकाही प्रस्थापित नेत्यांनी लोकप्रतिनिधी भाग घेतला नाही. मार्कट कमिटी अकलूज जाऊन मोहिते पाटलाच्या नेतृत्वाखाली बिनविरोध केली. विधानसभा निवडणूक होण्याआधी यांनी युती करून पदे वाटुन घेतली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढाईत कुणी सहभाग घेतला नाही. निवडणूक लागली की त्यांना स्वार्थ आठवला आहे. मी सर्व समाजाच्या कल्याणासाठी शासनाकडून काढलेल्या जीआरचे जो उमेदवार उत्तर देईल त्यांना बिनशर्त पाठिंबा देईल. विधानसभेला स्वतःचा प्रचार करण्यासाठी मोठ्या नेत्यांची का गरज पडली? आम्ही कामे करून पुढे आलो आहोत. यांनी काम केले नाही. त्यामुळे करमाळा तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकसभेप्रमाणे जनतेने निवडणूक हातात घेऊन यंदा झोळ सरांना निवडून द्यायचा निर्णय घेऊन मला *रिक्षा* चिन्हावर बटन दाबून विजयी करुन सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले आहे. दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आपणास पवित्र मतदानाचा अधिकार दिला आहे. तुमचे अनमोल मत शेतकरी सर्वसामान्य जनता, युवक, महिला, वंचित, कष्टकरी, सुशिक्षिताचे भवितव्य ठरवणारे आहे. करमाळा तालुका आता कुस बदलत आहे. विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यापूर्वी चार उमेदवाराचे शिक्षण, चारित्र्य त्यांनी केलेली कामे बघा. उगीच भावनिक होऊन गटातटाच्या घराणेशाहीच्या राजकारणात न अडकून आपल्या मुलांचे भवितव्य बरबाद करू नका. या निवडणुकीत पहिल्यांदाच एक संस्कृत, शिकलेला माणूस उभा आहे. कै.नामदेवराव जगताप यांनी शिक्षणासाठी काम केले. त्यानंतर कोणतेही नेत्यांनी शिक्षणाविषयी काम केले नाही. चातुवर्ण व्यवस्थेमुळे बहुजनाला शेती उत्तम सांगितले. त्यामुळे आमची ही शिक्षण न घेतल्याने बरबाद झाली. आत्तापर्यंत करमाळा तालुक्यात शिकलेले नेतृत्व मिळाले नाही. प्रा. रामदास झोळ सर यांनी भिगवण सारख्या ठिकाणी पाच हजार विद्यार्थी संख्या असलेली दत्तकला शिक्षण संस्था उभी केली. अनंत अडचणीतून मार्ग काढत त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. आपल्या भुकेपेक्षा लोकांची भुक भागवणे ही संस्कृती त्यांच्याकडे आहे आहे. सातशे मुलांना संस्थेमध्ये रोजगार दिला आहे. देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार आहे. दोनशे मुले रोजगार दिला जाणार आहे. कै.दिगंबरराव बागलमामा यांनी आपल्या गावात शिक्षण संस्था काढून शिक्षणाची सोय केली आहे. माझ्या मनगटात छत्रपती शिवाजी महाराज, डोक्यात बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत .आरोग्याची परिस्थिती अशी दयनीय का झाली. रोडकिंग आमदार, पाणीदार आमदार गेले कुठे? दुष्काळ पडल्यावर टँकरने पाणीपुरवठा केला आहे. विधानसभेला दहा पाच कोटी घालवून नवरात्रीनिमित्त अठरा हजार महिलांना देवदर्शन या माणसाने घडवले. त्या महिला नक्कीच मतदान करणार आहे. सर्व सुख पायाशी लोळण घेत असताना समाजासाठी काही तरी करायची इच्छा तळमळ या व्यक्तीकडे आहे. संवेधानिक पद पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी निवडणूक लढत आहेत. आमदार स्व. गणपतराव देशमुखाचे काम बघा फार्म भरायला जायचे या माणसाने पैसे राजकारणातुन कमविले नाही. त्यामुळे आजही त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे. प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्योग मंत्री आणयाची गरज नाही. मुख्यमंत्री मोळी टाकायला आले. मग यांनी कारखाना चालू करण्यासाठी काय काम केले? आदिनाथ, मकाई बंद असल्यामुळे बाकीचे कारखाने लुटुन खातील. याचा विचार करणे गरजेचे आहे. गटातटाची निष्ठा सोडा. मी आबांचा मामाचा, भाऊचा, अरे ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला, जमीन जुमला इस्टेट दिली, त्या तुमच्या बापाचे गट माना करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना निवडून देऊन सेवेची संधी द्यावी. असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी केले आहे. या सभेचे प्रास्ताविक सूत्रसंचालन श्रीकांत साखरे पाटील यांनी केले तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी मानले.