.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभेची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आली असून आमदार संजयमामा शिंदे यांच्या रोज रात्री होणाऱ्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.वरकटणे ,फिसरे,कंदर, कुर्डू येथील सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मी प्रथमच अंडर करंट अनुभवत आहे असं भाष्य आमदार संजयमामा शिंदे यांनी कंदर येथील सभेमध्ये केलेले होते.दि.१६ रोजी चिखलठाण नं.१ येथे आयोजित सभे साठी जमलेल्या जनसमुदायाने एकच छंद सफरचंद हा नारा देत सारा परिसर दुमदुमून गेला.
करमाळा विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविणाऱ्या आमदार संजयमामा शिंदे यांची सफरचंद ही निशाणी आहे .वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून आमदार संजयमामा शिंदे विकास कामांचा लेखाजोखा मांडत असतात . कुगाव चिखलठाण शेटफळ जेऊर हा रस्ता आपण निवडणुकीच्या पूर्वीच मार्गी लावू असा शब्द आमदार संजयमामा शिंदे यांनी दिला होता आणि आज प्रचार सभेसाठी ते आले त्यावेळेस संबंधित रस्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण केले जात आहे .त्यामुळे दिलेल्या शब्दाला जागणारा नेता अशी प्रतिमा जपण्यामध्ये मामा यशस्वी झाले असून सर्व उपस्थित चिखलठाण ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मामा पुन्हा निवडून येतील हा आशावाद व्यक्त करतानाच एकच छंद…सफरचंद अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला.
चौकट –
बॅकवॉटर साठी आमदार संजयमामा शिंदे एक वरदान…
बॅक वॉटरसाठी उजनी धरण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांना बसू नये यासाठी सोलापूर शहराला होणारा पाणीपुरवठा हा बंद पाईप द्वारे करण्याची योजना या पंचवार्षिक मध्ये पूर्ण होत असल्यामुळे येणाऱ्या काळात उजनी धरणातील वारेमाप पिण्यासाठी सोडणाऱ्या पाण्याची बचत होऊन मे महिन्यामध्ये ही धरण काठावरील शेतकऱ्यांना पाणी राहणार आहे. त्याचबरोबर डिकसळ पूल, कुगाव ते शिरसोडी पूल, उजनी धरणामध्ये सोडलेले मत्स्यबीज, उजनी धरण पर्यटन विकास आराखडा यामुळे या परिसराला अनन्यसाधारण महत्त्व आले असून पक्षी निरीक्षण, पर्यटन व्यवसाय, केळी निर्यात या सर्वच बाबतीमध्ये या परिसराचा कायापालट होणार असल्यामुळे बॅकवॉटर साठी आमदार संजयमामा शिंदे हे एक वरदान आहे अशी भावना येथील जनसामान्यांची बनली आहे.
– चंद्रकांतकाका सरडे चिखलठाण नं १
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…