करमाळा प्रतिनिधी; कुर्डुवाडी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या 244 करमाळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. या प्रचारसभेत डॉ.कोल्हे यांनी नारायण आबा पाटील उमेदवार म्हणजे खुद्द शरदचंद्र पवार उमेदवार आहेत समजून आबांना विजयी करा असे आवाहन केले.आपल्या भाषणात डॉ.कोल्हे यांनी संजयमामा शिंदे व बबनदादा शिंदे या दोघांवरही सडकून टीका केली. एकीकडे पवार साहेबांचे उंबरे झिजवायचे व दुसरीकडे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून अपक्ष लढायचे असे अविश्वासू दोन्ही बंधूंना पवार साहेबांच्या आदेशाचे पालन करत पराभूत करा असे आवाहनही केले. कुर्डुवाडी व परिसरातील जनता ठाकरे घराण्यावर व पवार साहेबांवर प्रेम करणारी आहे. ज्यांनी उद्दव ठाकरे साहेबांच्या व पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, संकट काळात आधार द्यायचा सोडून विश्वासघात केला अशा दोन्ही शिंदे बंधूंना पराभूत करून दाखवून द्या की, करमाळा,माधा मतदारसंघातील जनता ही गद्दारांना माफी करत नाही.
आजच्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते हुजुर इनामदार यांनीही मुस्लिम बांधवांचे एकही मत भाजप व महायुतीचा छुपा पाठिंबा घेणाऱ्या शिंदेंना पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
खासदार डॉ.अमोल कोल्हे, हुजुर इनामदार व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भाषणाने करमाळा तालुक्यासह छत्तीस गावातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रचार सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शेतकरी नेते अतुल खूपसे, घटनेकर पाटील, कुर्डूवाडीचे नेते दत्तात्रय गवळी, म्हैसगावचे सरपंच सतीश उबाळे यांची भाषणे झाली.
व्यासपीठावर माढा तालुक्याचे नेते बी. डी पाटील(बप्पा) यांचेसह माढा तालुक्यातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी उमेदवार नारायण आबा पाटील यांना मुस्लिम बांधवांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…