करमाळा प्रतिनिधी प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे भूमिपूजन आज होत आहे हे आमच्या शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे, मंदिराच्या आंदोलनात शेकडो शिवसैनिक शहीद झाले, अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला मात्र या सर्वांचे आज सार्थक झाले आहे असे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले. तसेच याच आनंदात आज करमाळा शहरात जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले. श्रीराम मंदिर व्हावे यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान सर्वात जास्त असून आज खऱ्या अर्थाने स्वर्गात सुद्धा हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असेही श्री. चिवटे यांनी सांगितले. तसेच आज करमाळा शहरात जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे शहर प्रमुख प्रवीण कटारिया युवा सेनेचे तालुका संघटक विशाल गायकवाड उद्योजक भाऊ हजारे अण्णा ढाणे पाटील शेखर जाधव, बाळासाहेब कटारिया उपस्थित होते. यावेळी प्रभु श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन महेश कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. शिवभोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना पेढे वाटून श्रीरामचंद्रांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…