करमाळा प्रतिनिधी रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य रोजगार समस्या सोडविण्यासाठी करमाळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक वेळ निवडून देऊन सेवेची संधी द्या असे मत प्रा.रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. चिखलठाण नं१ ता. करमाळा येथील जाहीर सभेत बोलत होते .यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीची दशरथ कांबळे,अनुरथ झोळ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे ओबीसी तालुका अध्यक्ष गफूर शेख ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, श्रीकांत साखरे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सुहास काळे भिमराव ननवरे पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे, उपस्थित होते.करमाळा माढ्यात ज्या सुविधा नाही त्या बारामती अकलूजला आहेत . आपल्याकडे शिक्षणाच्या रोजगाराच्या कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. रस्त्याचे पाण्याचे प्रश्न अद्यापही सुटले नाहीत. रोडकिंग आमदार असताना करमाळा तालुक्यात रस्ते का झाले नाही.पाणीदार आमदार असताना उजनीच्या पाण्याची नियोजन न केल्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातची गेली. पाणीटंचाईंला नागरिकांना सामोरे जावे लागले.मोठमोठ्या नेत्यांना आणतात गट तट एकत्र येऊन पाठिंबा घेतात.मार्कटकमिटीला भांडण करणारे एकत्र आले.शेतकऱ्याच्या ऊस बिलासाठी व पाण्याची सोय करण्यासाठी कुणी आले नाही.रस्ते पाणी वीज यांचे प्रश्न सोडवण्याचे लोकप्रतिनिधीचे कामेच असते. ते करण्याबरोबरच शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. करमाळा तालुक्याला सोलापूर विद्यापीठ असल्याने ते नव्याने सुरू झाल्यामुळे. स्वामी चिंचोली भिगवण येथे पुणे विद्यापीठ असल्याने भिगवणला दत्तकला शिक्षण संस्था सुरू केली आहे. करमाळा तालुक्यात व्यवसायिक शिक्षणाची सोय करण्यासाठी देवळाली येथे २०२६पर्यत शिक्षण संकुल सुरू करणार आहे. लोकप्रतिनिधी प्रस्थापित नेते मंडळींनी 29 वर्षात एम आय डी सी सुरू करता आली नाही.साधी पाण्याची सोय करता आली नाही.रोजगाराची संधी नसल्यामुळे युवकांना पुण्याला मुंबईला जावे लागत आहे. महात्मा गांधी विचारानुसार राष्ट्राच्या समृद्धीसाठी खेडयाकडे चला या शिकवणीनुसार रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्याची सुविधा केल्यावर खऱ्या अर्थाने समृद्धी होणार आहे. एम आय डी सी सुरू झाल्यावर सर्व भाग समुध्द होणार आहे. एमआयडीसी सुरू होण्याआधी रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात सोडवण्यासाठी पाचशे लोकांना रोजगार मैळावा घेऊन रोजगार मिळवून दिला आहे.साखर कारखान्याचे बिल मिळवून दिले.दुष्काळात पाणी पुरवठा टँकरने पाणीपुरवठा केला आहे. करमाळा तालुक्याचा इतिहास आहे की दर पाच वर्षामध्ये काम न केल्यास आमदार बदलतात.सध्या दोन्ही कारखाने बंद आहेत.त्यामुळे अडीच हजार रोजगार बुडाले आहेत.लोकसभेत जनतेनी निवडणूक हातात घेऊन मला निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन प्रा रामदास झोळसर यांनी व्यक्त केले. चिखलठाण मध्ये वीस वर्षांत पहिल्यांदाच सभा झाली आहे करमाळा तालुक्यात व माढा तालुक्यातील 36 गावांमध्ये सर्व सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला रिक्षा चिन्हावर बटन दाबून विजयी करा असे आवाहन प्राध्यापक रामदास झोळसर यांनी केले . यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की आरक्षणामुळै बांगलादेश पेटले तशीच परिस्थिती भारतात होणार आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामदास झोळसर यांनी शैक्षणिक सवलती मिळवून देण्यासाठी आठ जी आर काढले आहे.सहावेळा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले. त्यावेळी एकमेव नेता प्राध्यापक रामदास झोळसर यांनी त्यांना भेट देऊन पाठिंबा दिला आहे.आरक्षणाचा शासनाने कुठला निर्णय घेतला नाही त्यांचे बरोबर काम करणार आहे.मराठा धनगर मुस्लिम लिंगायत समाजाला आरक्षण मिळाण्यासाठी ते काम करणार आहेत.शिक्षण आरोग्य रोजगार यावर कोणी बोलत नाही. आतापर्यंतच्या नेते मंडळींनी उमेदवारानी काय केले सर्वाचे आमदार झाले कोणी आरक्षणाला पाठिंबा दिला नाही.ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. कै नामदेव जगताप यांनी शिक्षणाची सोय केली होती. त्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी शिक्षणासाठी काम केले नाही . उजनी धरण आणून पाण्याचा प्रश्न सोडवणारे साहेब होते. या निवडणूकीत महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे वातावरण पेटले आहे.बारा कोटीपै की सहा कौटी मराठा समाज आहे.मराठा समाज सध्या उघडा पडला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळला पण त्यांना आरक्षण देता आले नाही.या लढ्याकरता सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू प्रामाणिक नेतृत्व असुन प्रा रामदास झोळसर यांना निवडून द्या असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी केले. या सभेला शेतकरी युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक सूत्रसंचालन श्रीकांत साखरे पाटील यांनी केले तर आभार गणेश मंगवडे यांनी मानले.