करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील लाडकी बहीणीचा ज्येष्ठांचा आर्शिवाद आपल्या पाठीशी आहे.युवक उमेदवार म्हणून सर्वांनी आपल्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. करमाळा तालुक्यातील विकासकांमाना गती देण्यासाठी युवक म्हणून सर्व सामान्य जनतेचे पाठबळ मिळत असून या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित असल्याचे उमेदवार दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले.भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे . सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी माजी आमदार शामलताई बागल म्हणाले की बाकी इतर उमेदवारापेक्षा त्यांच्या राजकीय कारकीर्दीपेक्षा सर्वात सुशिक्षित उमेदवार म्हणून दिग्विजय बागल निवडणुकीसाठी उभा आहे. स्वर्गीय डिगामामाचा मुलगा म्हणून जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विशेष प्रेम असून स्वर्गीय मामांच्या कार्याची पावती जनता नक्कीच देईल असा विश्वास माजी आमदार श्रीमती शामलताई बागल यांनी केला आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…