करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा निवडणूक रंगतदार चुरशीची होणार असून करमाळा शहर व तालुक्यामध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले असून एकूण 15 उमेदवारात ही लढत होत असली तरी चार उमेदवारांमध्ये लढत आहे . विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत असून या निवडणुकीत त्यांना जयव़ंतराव जगताप व सावंत गटाचा पाठिंबा यावेळी मिळाला नसून त्याऐवजी नागरिक संघटना देवी गट भाजपचे मा .जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे व त्यांच्या सहकाऱ्याचा पाठिंबा मिळाला आहे. मनसे तसेच मित्र पक्षातील इतर लोकांचाही पाठिंबा त्यांना मिळाला अहे. तीन हजार कोटीची विकास कामे केल्यामुळे जनता आपल्याला पाठवळ देईल मतधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील शरदचंद्र पवार गटाकडून उभे असून मोहिते पाटील गट , माजी आमदार जयवंतराव जगताप सावंत गट मुस्लिम समाज, भटक्या मुक्त जाती जमाती संघटनेचा पाठिंबा मिळाला असून महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेले यश ही जमेची बाजू आहे.आबांनी केलेल्या कामावर जनता खुश असून या निवडणुकीत आबांनी जनता आपल्याला केलेल्या कामाची पोचपावती देऊन विजय करणार असल्याचा विश्वास नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला आहे.महायुतीकडुन दिग्विजय बागल शिवसेनेकडून निवडणूक लढवत असून मा.राज्यमंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांना मानणारा गट बागल गट त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून शिवसेना पक्ष व भाजप मित्र पक्षाच्या मतामुळे व महायुतीचे सरकार राज्यात असल्यामुळे त्यांच्या लाडकी बहीण योजना शेतकरी पेन्शन मुलींना मोफत शिक्षण, एसटी प्रवास सवलत या कल्याणकारी योजनेचा फायदा दिग्विजय बागल यांना होणार असल्याचे दिसत असून या निवडणुकीत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या कार्यामुळे देशात राज्यात महायुती सरकार असल्याने लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित असल्याचे महायुती शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला आहे . करमाळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी रस्ते, पाणी, वीज ,शिक्षण आरोग्य ,रोजगार या बाबीवर जोर दिल्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असुन शैक्षणिक समानतेच्या धोरणावर मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण शैक्षणिक सवलती मिळवून देऊन मराठा ओबीसी बहुजन समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल करमाळा तालुक्याच्या शिक्षण आरोग्य रोजगार हे प्रश्न सोडण्यासाठी करमाळा तालुक्यातील जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास प्राध्यापक रामदास झोळसर यांनी व्यक्त केला आहे .एकंदर करमाळा विधानसभेची निवडणूक चौरंगी होणार असून या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला असून जनतेमध्ये विकासाच्या नावाखाली केलेली कामे व प्रत्यक्षात केलेली कामे याची गोळा बेरीज करून जनतेला शाश्वत विकासाकरीता सर्वसामान्य जनतेच्या मनात जो स्थान निर्माण करू शकतो तोच उमेदवार या निवडणुकीमध्ये विजय संपादन करू शकतो . सर्वसामान्य जनतेने एकूण 15 उमेदवारांना मतदान केले असले तरी या चार प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची लढत आपणास पाहण्यास मिळणार आहे. मतदार राजांनी आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करून त्याचे भविष्य पेटीमध्ये बंद केले आहे. जनतेच्या मनातील आमदार कोण याचे उत्तर हे 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यावर समजणार आहे.या निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणे जनतेकडून महायुतीच्या विरोधात उस्फूर्तपणे मतदान झाले नसून याचा फायदा नक्की कोणाला होणार हे आता गुलदस्त्यात आहे.विद्यमान आमदार संजयमामा शिंदे माजी आमदार नारायण आबा पाटील शिवसेना महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल अपक्ष उमेदवार रामदास झोळ यांच्यामध्ये लढत झाली असून विजयाचा कौल छत्तीस गावावर अवलंबून आहे.करमाळा तालुक्यातील 118 गावे माढा तालुक्यातील छत्तीस गावात मतदान संपन्न झाले आहे.करमाळा माढा विधानसभा निवडणूकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडले . निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.करमाळा शहर व तालुक्यामध्ये एक वाजेपर्यंत मतदान अतिशय संथगतीने चालू होते.त्यानंतर मात्र नागरिकांनी घराबाहेर पडून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे. करमाळा माढा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील 118 गावे माढा तालुक्यातील छत्तीस गावे असे एकूण एकूण पुरुष 171515, महिला 157468, इतर 11, टोटल 328994 एवढे मतदार आहेत. त्यापैकी पुरुष119583 महिला 103621 इतर 3 टोटल 223207 एवढे मतदान झालेले आहे. पुरुष 69.72%, महिला 65.80%, इतर 27.27%, टोटल 67.85% एवढे मतदान सकाळी सात ते सहा वाजेपर्यंत झालेले आहे.यामध्ये अंदाजे थोडाफार बदल होऊन 70 टक्के मतदानाची आकडेवारी राहणार असल्याची निवडणूक निर्णय अधिकारी सौ अंजली मरोड सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी सांगितले आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील मतदार राजांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेले आहे. हे मतदान महायुती महाविकास आघाडीपेक्षा उमेदवार बघून मतदान झाले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूक एकतर्फी होणार नसून महायुती महाविकास आघाडी अपक्ष सर्वांना समान संधी देणारी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आमदार म्हणून निवडून दिलेल्या मतदारांच्या पसंतीची होणार हे स्पष्ट झाले आहे .
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…