Categories: करमाळा

करमाळा विधानसभेसाठी १४ टेबलवर मतमोजणी २५ फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण

करमाळा प्रतिनिधी

करमाळा माढा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता सुरू होणार आहे. यासाठी १४ टेबलवरुन २५ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. याकरीता प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी सुमारे ११६अधिकारी कर्मचारी तर ‘सुरक्षेसाठी १३७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड सहाय्यक निवडणूक अधिकारी सौ शिल्पाताई ठोकडे यांनी दिली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख २९ हजार ३२३ मतदारांनी मतदान केलेले असून, मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर रोजी शासकीय धान्य गोदाम करमाळा तहसील कार्यालय येथे होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल ची संख्या आहे. तर २५ फेऱ्यांतून मतमोजणी पूर्ण होणार आहे.
मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत पासधारकांसह मतमोजणीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच मतदारसंघाची मोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाईल. चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नयेत
जनतेने अत्यंत विश्वासाने लोकशाहीचा उत्सव साजरा करताना मतदान केलेले असते, अश्या वेळी काही तरी चुकीचे व खोटी • माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नये की, अफवा पसरवू नये व अश्या खोट्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ही ठेऊ नये असे सांगत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मात्र की अश्यावेळी निवडणूक आयोगाची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी ही अश्या चुकीच्या अफवा पसरवू नये व कोणत्याही खोट्या अफवांना बळी पडू नये. असे केल्याने निवडणूक आयोगाची प्रतिमा मालिन होऊन, लोकशाही व मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आहे. असे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल
*अंजली मरोड निवडणूक निर्णय अधिकारी

*निवडणूक काळात दाखल झालेले गुन्हे प्रदीर्घ काळ रेकॉर्डवर राहतात. १४ पोलीस अधिकारी १२४ पोलीस कर्मचारी पोलीस कर्मचारी , एक दंगा काबू पथक तसेच शहर व परिसरात पेट्रोलिंग करण्यासाठी एक पथक नेमण्यात आले असून, मतमोजणी परिसरात कडकोड बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जो काही निकाल येईल तो जनमताचा कौल समजून सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारावा. कायदा व सुव्यवस्था निम बर णि होईल असे कोणतेही कृत्य करू नये. जेणेकरून त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, तसे झाल्यास प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. कारण या काळात दाखल झालेले गुन्हे प्रदीर्घ काळ रेकॉर्डवर राहतात त्यामुळे शांततेत निवडणुक मतमोजणी पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. विनोद घुगेसाहेब पोलिस निरीक्षक करमाळा

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago