Categories: करमाळा

करमाळा ‌ विधानसभा निवडणुकीत‌ विद्यमान आमदार विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव करून ‌ नारायण आबा पाटील मताधिक्यानी विजयी

करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा निवडणुकीत नारायण आबा पाटील यांनी मताधिक्याने विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे शिवसेनेचे दिग्विजय बागल तसेच पहिल्यांदा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे अपक्ष निवडणूक लढवणारे प्राध्यापक रामदास झोळसर यांचाही मतदारांनी पराभव केला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नारायण पाटील यांनी ९६०९१ मते घेत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा १६०१९ मतांनी पराभव केला असून संजयमामा शिंदे यांना ८०००६ एवढी मते तर शिंदे गटाकडून लढत असलेले दिग्विजय बागल यांचा पराभव झालेला आहे. बागल यांना ४०५४१ एवढी मते मिळाली३ हजार कोटींचा विकास, कागदावरचा विकास आणि पराभव-
विधानसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्यासाठी सभा घेतली त्या सभेत ३ हजार कोटींची विकास कामे झाल्याचे अजितदादा बोलले होते, विरोधकांनी याचा पुरेपूर समाचार घेऊन जनतेसमोर खरे काय आहे याची गणिते मांडली, कागदावरच्या विकासाला जनतेने सपशेल नाकारले असून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव झालेला आहे पाटील-शिंदे- बागल अशी तिरंगी असणारी निवडणूक दुरंगी मोडवर आली. एकेकाळी एक नंबरला असलेल्या बागल गटाचे अस्तित्व आता धोक्यात आले असून भविष्यात गट टिकवायचा असेल तर तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील ‌. ते राष्ट्रवादीच्या (शरद पवार) ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनी अजितदादा पवार यांचे समर्थक अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा पराभव केला आहे. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे तिसऱ्या स्थानी राहिले आहेत. पाटील हे 15 हजार 740 मतांनी विजयी झाले आहेत.
करमाळा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांचा पाठींबा काढत माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटाने पाटील यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली होती. पाटील यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली ती शेवटपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली. महायुतीचे उमेदवार बागल हे दहाव्या फेरीपर्यंत दुसऱ्या स्थानी होते. या फेरीनंतर शिंदे हे दुसऱ्या स्थानी आले मात्र ते पाटील यांना गाठू शकले नाहीत. करमाळा व माढा या दोन्ही तालुक्यात ते पिछाडीवर राहिले.संजयमामा शिंदे यांच्यावर माढा तालुक्यातील ३६ गावात रोष असल्याचे नेरिटिव्ह नारायण आबा पाटील गटाने तयार केले. ते घालवण्यात शिंदे अपयशी ठरले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पवार गटात प्रवेश केला. तेव्हा करमाळ्याचे नारायण पाटील यांनीही पवार गटात प्रवेश केला होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
. लोकसभेप्रमाणे जनतेने ही निवडणूक ‌ हातात घेऊन मतदान केले ‌ मराठा धनगर मुस्लिम दलित याबरोबरच सर्व समाजाच्या नागरिकांनी नारायण आबा पाटील यांनी केलेल्या कामामुळे जातीपातीच्या पक्षीय राजकारणात न अडकता देशाचे नेते शरदचंद्रजी पवार ‌ यांच्या ‌ आव्हानाला प्रतिसाद देत ‌ नारायण आबा पाटील ‌ यांना मताधिक्याने ‌ निवडून दिले आहे. करमाळा तहसील ‌ कचेरी शासकीय गोदाम येथे ‌ सकाळी आठ वाजता ‌ मतमोजणी ‌ 14 टेबलवर ‌ 25 फेऱ्यांमध्ये ‌ पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी ‌ अंजली मरोड सहाय्यक निवडणूक अधिकारी सौ शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी मतमोजणीसाठी ‌११६ कर्मचारी‌ सुरक्षेसाठी 114 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते . पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.पहिल्या फेरीपासूनच ‌ नारायण आबा पाटील ‌ यांनी ‌ आघाडी घेतली होती ‌ करमाळा तालुक्यातून ‌ तर ‌ त्यांनी ‌ लीड मिळावलाच परंतु‌ माढा तालुक्यातील छत्तीस गावांमधील ‌ त्यांनी भरघोस मते मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेस ‌ पक्षाची तिकीट ‌ पवार साहेबांना मानणारा ‌ मतदार ‌ तसेच करमाळ्याची माजी आमदार ‌ जयवंतराव जगताप ‌ सावंत गट ‌ मोहिते पाटील गट ‌ यांचा मिळालेला पाठिंबा ‌ यामुळे आबाचा ‌ विजय झाला आहे. गेल्या पंचवार्षिकला माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजयमामा शिंदे यांना आमदार करण्यासाठी भूमिका बजावली होती .यावेळीही त्यांनी नारायण आबा पाटील ‌ यांना आमदार करण्यासाठी किंग मेकर म्हणून यशस्वी भूमिका बजावली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

1 day ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago