करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जनतेने मत रुपी आशीर्वाद देऊन महायुतीच्या माध्यमातून आपणास भरभरून मते दिली आहे.जनतेचे हे प्रेम ऋण आपण कायम मनात ठेवून जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन निरंतर सेवेत राहणार असल्याचे शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले. शिवसेना भाजप महायुती कडून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिग्विजय बागल यांच्या विद्यानगर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेस मार्गदर्शक विलासराव घुमरे सर मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रमेश अण्णा कांबळे. कृषी बाजार समिती माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ हाके ,सतीश बापू नीळ, बाळासाहेब अनारसे, सचिन बापू पिसाळ ,माजी संचालक सुनील लोखंडे माजी नगरसेवक राहुल भैया जगताप, बाळासाहेब क्षीरसागर बाजार समिती मा. संचालक रंगनाथ शिंदे युवराज रोकडे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या युवकाला शिवसेनेचे तिकीट घेऊन उमेदवारी दिली. 28 दिवसाचा कालखंड असतानाही शिवसेना-भाजप घटक मित्रपक्षांनी रात्रंदिवस प्रचार यंत्रणा राबवून माझ्यासाठी काम केले. जनतेनेही मला भरभरून प्रेम दिले. रश्मी दीदी बागल यांच्या 2019 च्या पराभवानंतर मागील साडेचार वर्षात जनसंपर्क नसताना आम्ही राजकारणामध्ये पूर्णतः आमची मानसिकता बॅक फुटवर गेली होती . मात्र गेल्या सहा महिन्यातच मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनातून लोकसभेला भाजपमध्ये रश्मी दीदींचा बागल प्रवेश तसेच शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे पाठबळ मिळाल्यामुळे स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांचा मुलगा म्हणून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून आम्ही तालुक्यामध्ये जनतेच्या विश्वासात पात्र ठरलो आहे. जरी पराभव झाला असला तरी राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून देशामध्ये आपलेच सरकार असल्याने विकास कामाचे कुठलीही काम आपल्या सरकारच्या सहकार्यातूनच होणार आहे. त्यामुळे मी जनतेच्या कायम संपर्कात राहून जनतेची सेवा करणार आहे. मकाई कारखान्याचे विस्तारीकरण करून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्याचा आमचा मानस आहे. करमाळा तालुक्यातील रस्ते त पाणी वीज रखडलेली विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहून रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावणे बरोबरच कुर्डूवाडी बेंदवड्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मार्गदर्शक विलासराव घुमरे सर रश्मी दीदी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पाच वर्षात विधानसभेच्या दृष्टीने करमाळा तालुका छत्तीस गावामध्ये जनसंपर्क वाढून जनसामान्याचे काम करणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेत मार्गदर्शक विलासराव घुमरे सर म्हणाले की विधानसभा निवडणूक निकालाबाबत आम्ही जनतेचा कौल स्वीकारला असून जनतेने जी मते दिली त्याबाबत आम्ही समाधानी असून लाडकी बहीणीचा मतांचा आशीर्वाद आम्हास लाभला आहे .त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मकाई आदिनाथ कारखाना याबरोबरच. तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित दादा पवार यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार असून दिग्विजय बागल यांना 2029 ला आमदार करण्याचा आमचा संकल्प असून येत्या पाच वर्षात तो पूर्ण करून दाखवणार आहे. आता किंगमेकर अनेक झाले आहेत मी मार्गदर्शक म्हणूनच काम करून प्रिन्सला आमदार करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील सुशिक्षित मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून जनसंपर्काच्याबाबत कमी कालावधी मिळाला असल्या तरी जनतेने नव्याने उभा राहिलेल्या दिग्विजय बागल यांना स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांचा मुलगा शिवसेना भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून चांगली मते दिली आहेत. त्यामुळे आमचे लक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आदिनाथ कारखाना मकाई कारखाना नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुका असून पक्षाच्या माध्यमातून निवडणुका जिंकून पक्ष मजबूतीबरोबर जनतेला न्याय मिळवून देणार असल्याचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांनी सांगितले आहे.