करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील संत गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भागवताचार्य अनुराधा दीदी यांच्या पावन वाणीमध्ये 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. करमाळा शहर व तालुक्यामध्ये कोरोना नंतर बऱ्याच वर्षांनी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संत गजानन महाराज मंदिराच्या कुरुलकर मॅडम यांनी केले आहे. भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा मोठ्या प्रमाणात सादर होणार असून या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी 27 नोव्हेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त ५१ हजार रुपये देणगी जाहीर केली असून त्यांना श्रीमद् भागवत कथेचे यजमानपद देण्यात आले आहे.श्रेणिकशेठ खाटेर यांनी यजमान पद घेतल्याबद्दल संत गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार कुरुलकर मॅडम प्रदीप देवी यांच्या हस्ते करण्यात आला. भागवत ज्ञानयज्ञ कथा कार्यक्रम नियोजन बैठकीसाठी जगदीश शिगची,विजयराव देशपांडे रवींद्र विद्वत देविदास,नष्टे सर ,गंधेकाका शशिकांत कुलकर्णी पत्रकार दिनेश मडके, संजय तनपुरे नितीश देवी, मा . नगरसेविका सौ संगिताताई खाटेर,सौ.मनिषा मसलेकर सौ. सूनिताताई चिवटे,सौ प्रभावती चिवटे सौ. छाया सोरटे ,शोभा पुराणिक, मंगल पुराणिक,वर्षा गायकवाड महिला भगिनी उपस्थित होते. करमाळा शहरात राम कथा भागवत कथा शिवपुराण कथा या कार्यक्रमाचे आयोजन करमाळा शहरातील सर्व भाविक भक्त यांच्या सहकाऱ्यांनी संपन्न झाले असून करमाळा शहरात पाच सहा वर्षानंतर धार्मिक कार्यक्रम होत असून या कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी संयोजन समितीची निवड करण्यात येणार असून करमाळा शहर व तालुक्यातील भाविक भक्त नागरिकांनी भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यजमान श्रेणीकशेठ खाटेर यांनी केले आहे.