करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या स्वाभिमानी नेत्या सौ. रश्मी दीदी बागल यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याचे होणारे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट स्वाभिमानी नेत्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष मा. रश्मी दिदी बागल त्यांचे पती गौरव कोलते यांनी घेतली. महायुतीच्या प्रचंड यशाबद्दल मा. मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन केले लवकरच बागल गटाला एक उत्साह वाढवणारी आनंदी बातमी भेटणार आहे. महायुतीतून रेशमी दीदी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवली यामध्ये कमी कालावधी असताना सुद्धा जनतेने त्यांना भरभरून मते दिली. महायुती व अपक्ष उमेदवारामुळे मत विभागणीचा फटका बसल्यामुळे दिग्विजय बागल यांचा पराभव झाला. परंतु पक्ष निष्ठेसाठी मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतून निवडणूक लढवल्यामुळे दिग्विजय बागल यांचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांचे देवेंद्र फडवणीस यांनी कौतुक केले असून सौ रश्मी दीदी बागल यांनी भाजपची जागा न सुटल्यामुळे आपल्या बंधूंना या ठिकाणी विधानसभेला उभा केले. भाजप प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या सौ. रश्मी दीदी बागल यांच्या नेतृत्वाचा विचार करून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात योग्य संधी मिळणार असल्याने बागल गटाचा उत्साह वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.