यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, करमाळा ही आपली जन्मभूमी असून त्याचे ऋण फेडण्यासाठी बारामती, पुणे, इंदापूर या शहराप्रमाणे करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून, संवैधानिक पदांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज तसेच शिक्षण, आरोग्याच्या समस्या सोडवता येत असल्याने विधानसभेची निवडणूक आपण लढवली आहे. जरी आपला पराभव झाला असला तरी परिवर्तनाच्या या लढाईमध्ये शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक, महिलांचा मिळालेला पाठिंबा नक्कीच मला बळ देणार असून जनतेच्या कल्याणासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका गावागावामध्ये शाखा काढून कार्यकर्त्यांना त्यामध्ये सहभागी करून समाजकारणातून राजकारण करण्याचा मानस असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले. कार्यकर्ता विचार विनिमय बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली यामध्ये काहींनी पक्षीय राजकारणात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. तर काहींनी पदवीधर मतदार संघातुन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये आपली शाखा निर्माण करून अकरा सदस्याचे मंडळ व सहयोगी सदस्य म्हणून झोळ परिवार निर्माण करण्याची मागणी केली. करमाळा तालुक्यात शैक्षणिक उपक्रमावर भर देऊन CET, NEET, JEE शिक्षणाची सोय करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. आपण सर्व तालुक्यांमध्ये आपली ताकद दाखवल्यानंतर, तालुक्यातील कुठल्याही गट आपणाला विचारात घेऊन युती करून निवडणूक लढवण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. करमाळा तालुक्यात झोळ फाउंडेशनच्या शाखा मार्फत नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे. रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांच्यासाठी लढत राहून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी झोळ परिवाराची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मनोगत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावर सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार प्रा. रामदास झोळ सर यांना असून त्यांनी जो निर्णय घेतील तो शिरसावंद्य मानून काम करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर प्रा. रामदास झोळ सर यांनी पुढच्या काळामध्ये सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे . कमी कालावधीमध्ये जनतेचे भरभरून प्रेम मिळाले शेतकरी हितासाठी आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस बिल मिळवून दिले आहे. गावागावामध्ये टँकरने पाणी पुरवठा, बाकडे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅड वाटप, नवरात्रात भक्तांना मोफत देवदर्शन यात्रा, मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठबळ देण्यासाठी चार चाकी गाडयांना इंधन देण्याचे काम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केले आहे. करमाळा तालुक्यातील ११८ गावे माढा तालुक्यातील छत्तीस गावे यांनी केलेले प्रेम स्वागत नक्कीच प्रेरणादायी असून कार्यकर्त्यांनी हिम्मत ना हरता नवीन वर्षात संकल्प करून गाव तिथे आपला माणूस आपले विचार पोहोचण्यासाठी कार्यरत राहावे. उद्याचा सूर्य नक्कीच आपणास यशाच्या शिखरावर नेणार आहे. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, करमाळा तालुक्यात प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या शाखा काढुन गावागावात कार्यकर्त्याचे संघटन उभा करून त्यांना पाठबळ देऊन करमाळा तालुक्यात राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन करमाळा तालुक्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचे दशरथ आण्णा कांबळे यांनी विचार विनिमय बैठकीत व्यक्त केले. करमाळा तालुक्याच्या येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीत आपले किमान वीस प्रतिनिधी तरी दिसणार अशी आशा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता नवीन वर्षामध्ये संकल्प करून गाव तिथे प्रा. रामदास झोळ सर यांचा परीवार मजबूत करण्यासाठी फाउंडेशनच्या शाखा काढण्यासाठी कामाला लागावे. येणारा काळ आपल्याला नक्कीच मोठे यश देणार आहे. या बैठकीचे प्रास्ताविक श्रीकांत साखरे पाटील यांनी केले सूत्रसंचालन गोपीनाथ पाटील सर तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे यांनी मानले.
*चौकट*
*करमाळा तालुक्यातील गटातटाच्या राजकारणाला सर्वसामान्य नागरिक जनता कंटाळली असून, सुशिक्षित, संस्कृत, नेतृत्व म्हणून प्रा. रामदास झोळ सर यांचे नेतृत्व जनतेला हवे आहे. प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या शाखा करमाळा तालुक्यात काढुन गावागावांमध्ये झोळ परिवाराची ताकद निर्माण करून, आगामी निवडणुका प्रा. रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी व्यक्त केले आहे*
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…