करमाळा प्रतिनिधी,
करमाळा तालुक्यात समाजकारणाबरोबरच राजकारणामध्ये ही झोळ परिवाराची पकड मजबूत होताना दिसून येत आहे. आज कोंढार चिंचोली येथे झोळ परिवार समर्थक श्री ज्ञानेश्वर गलांडे यांची उपसरपंच म्हणून निवड झाली. त्यावेळी त्यांचा सहर्ष सत्कार प्रा. रामदास झोळ सर व सौ. माया झोळ मॅडम यांनी केला. यावेळी कोंढार चिंचोली गावचे सरपंच शरदजी भोसले, तसेच अनिल डफळे, प्रकाश गलांडे, मनोज साळुंखे, भरत लांडगे, चंद्रशेखर जगताप, ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रा. रामदास झोळ म्हणाले की, करमाळा तालुक्यातील विविध समस्या जसे की वीज, रस्ते, पाणी त्याचबरोबर शिक्षण व आरोग्य ह्या सोडवण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर परिवार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यापुढे असेच आपण करमाळा तालुक्यात समाजकारणाबरोबर राजकारणहीतही सक्रिय सहभागी राहणार आहोत असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता जोमाने कामाला लागण्यास प्रा. रामदास झोळ सर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शित केले. इथून पुढे करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोहोचण्याकरिता आपणास करमाळा तालुक्यातील विविध समस्यांवर निवारण काढण्यास भर दिला पाहिजे. तसेच कुठल्याही गटा तटात न आटकता निस्वार्थपणे करमाळा तालुक्यातील समस्या सोडविण्यात सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी कोंढार चिंचोली चे सरपंच श्री शरदजी भोसले व उपसरपंच श्री ज्ञानेश्वर गलांडे यांनी प्रा. रामदास झोळ सर व प्रा. माया मॅडम यांचे आभार व्यक्त केले.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…