Categories: करमाळा

करमाळ्यात 16 फेब्रुवारी रोजी श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी – श्रीराम प्रतिष्ठान,करमाळा आयोजित सालाबाद प्रमाणे चालू वर्षी ही भव्य-दिव्य स्वरूपात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 16 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे,अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.                पुढे बोलताना ते म्हणाले की गेली दोन वर्षापासून आम्ही करमाळा तालुक्यातील व परिसरातील सर्व जाती-धर्मातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत लावून देत आहोत.सन 2023 मध्ये 21 व सन 2024 मध्ये 31 विवाह सोहळे आम्ही यशस्वी पार पाडले आहेत.या वर्षी आमचे हे तिसरे वर्ष असून आम्ही जास्तीत जास्त विवाह श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावणार आहोत.या विवाहामध्ये वधू-वरांना आवश्यक त्या माना पानाच्या सर्व सुविधा देणार आहोत.तसेच या विवाह सोहळ्यात वधू वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी सामाजिक,राजकीय व धार्मिक श्रेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या विवाह सोहळ्यात तालुक्यातील व परिसरातील वधू- वरांनी जि.एन .सि मिल्क सेंटरच्या करमाळा, कोर्टी, वरकुटे, घारगाव येथील केंद्रावर तसेच गायकवाड चौक करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालय व श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था दत्तपेठ करमाळा येथे नोंदणी करावी. या सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान गणेश चिवटे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

10 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago