Categories: करमाळा

भाजपा गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड होताच करमाळा भाजपाकडून जल्लोष

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड होताच करमाळ्यात भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून करमाळा भाजपा संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला,
यावेळी देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता,
गेली अनेक दिवस प्रलंबित असलेली भाजपा विधिमंडळ पक्षनेता पदाची निवड आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांच्या बैठकीत झाली. यावेळी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपा गटनेते पदी निवड झाली असून आता त्यांचे मुख्यमंत्री पद निश्चित झाले आहे.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विकासाला दिशा मिळणार आहे असे मत गणेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केले, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील जनतेने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकासाला मत दिले आहे , आज भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम होईल असा आत्मविश्वास भाजपा कार्यकर्त्यांमध्ये व महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे, येणाऱ्या काळात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आपणही करमाळा तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले,
यावेळी अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे , जगदीश अग्रवाल, भगवानगिरी गोसावी, काकासाहेब सरडे ,अमोल पवार, नितीन झिंजाडे, प्रवीण बिनवडे, गणेश महाडिक, जयंत काळे पाटील,सोमनाथ घाडगे, भैयाराज गोसावी, किरण शिंदे, नितीन निकम, नानासाहेब अनारसे, दिनेश काळे, बापू तांबे , सचिन गायकवाड, दत्तात्रय वाळुंजकर, संगीता नष्टे , पूजा माने, राजश्री खाडे, चंपावती कांबळे, कमलेश दळवी, नागनाथ घाडगे, सयाजी जाधव, कपिल मंडलिक, राजेश पाटील, प्रकाश ननवरे, सुभाष शिंदे, गणेश झाकणे, प्रसाद गेंड , वसीम सय्यद, किरण बागल, गणेश माने, भैय्या कुंभार, संजय किरवे, शंभू किरवे, संजय जमदाडे, दादा गाडे, अतुल इंदुरे, दिपक शेळके, भरत चोपडे, विवेक अवसरे, गणेश गोसावी, विनोद इंदलकर, महादेव गोसावी, भरत गुंड, संतोष जवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

1 day ago

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…

2 days ago

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

  करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…

2 days ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

2 days ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

3 days ago