करमाळा प्रतिनिधी करमाळा एस स्टॅन्ड बस स्थानक परिसरामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा बस स्थानक चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यात मुद्देमाल जप्त करण्यात करमाळा पोलिसांना यश मिळाले आहे . याबाबत हकीकत अशी की २२/११/२०२४ रोजी दुपारी ०२/३० वा. व सुमारास फिर्यादी नामे शितल बिभीषण रोडे, ययः ३५ वर्षे, रा. आळजापूर, ता. करमाळा या करमाळा बस स्थानक येथून त्याचे गावी आळजापूर येथे जाण्यासाठी एस. टी स्टॅन्डवर थांबल्या असताना कोणीतरी अज्ञात चारटयाने त्यांच्या पर्समधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन, ९ सॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, ९ मॅन वजनाचे फुले-झुबे व ८ रॉम वजनाची सोन्याची चैन असे एकूण २,३०,०००/- रु. किंमतीचे दागीने चोरी केल्याबाबत करमाळा पोलीस ठाणेस गु.२.नं. ७४६/२०२४, भा.न्या. सं कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच दि. २४/११/२०२४ रोजी दुपारी ०२:०० वा. वे सुमारास वृध्द महिला नामे छाया बंडेश पांढरे, वयः ७० वर्षे, रा. सोलापूर या करमाळा ते कुडुवाडी चसने प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा पढ्न त्यांच्या उजव्या हातातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली हातातुन काढून चोरी केली. त्याबाबत करमाळा पोलीरा ठाणेस गु.२.नं. ७६६/२०२४, भा.न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण हद्दीमध्ये मागील काही महिन्यापासून चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रितमयावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील, करमाळा उपविभाग यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री विलोद घुगे यांचे मार्गर्शनाने पोलीस ठाणेकडील तपास पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाआधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नाम सोमनाथ दिलीप काळे, क्यः २३ वर्षे, रा. थेरगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले असता गोपनिय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा मौजे थेरगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथे असल्याची माहीती मिळाली सदर माहीतीच्या अनुषंगाने बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता दोन दिवस आरोपीचा माग घेल पोलीस पथक सदर गावामध्ये थांबून आरोपी यास पकडून सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे. तपासादरम्यान त्याच्याकडे सदर गुन्हयातील गेले. मालाबाबत चौकशी केली असता आरोपीने करमाळा पोलीस ठाणेस गु.२.नं. ७४६/२०२४, भा. न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे मधील चोरलेल्या मालापैकी २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन व २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलस असा एकूण १,४५,०००/- रु. किंमतीचे दागीने तसेच करमाळा पोलीस ठाणेस गु.२.नं. ७६६/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०३०२) प्रमाणे गुन्हयातील अंदाजे ५०,०००/- २. किंमतीची १५ वॉल वजनाची एक सोन्याची पाटली असे एकुण १,२५,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागीने काढून दिले आहेत सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.ना./९१२ ठेंगल व पो. हवा./१६४८ उबाळे हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलोग 3 दक्षक श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) अपर पोलीस अधीक्षक, श्री.प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पाल्की १६४८ अजित उबाळे वैभव ठेंगील, मनिष पवार, पोकों तौफीक काझी पोलीस काॅ ज्ञानेश्वर पांगडे, पोकों/२१४२ गणेश शिंदे, पोकों ४३८ रविराज गटकुळ, पोकों ११४३ सोमनार जगताप तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोना २२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…