केत्तुर (वार्ताहर)- करमाळा व इंदापुर तालुक्याचे दरम्यान भिमा नदीचे पात्रावर मागिल सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , आमदार दत्तात्रय भरणे व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रयत्नातुन कुगाव ते शिरसोडी दरम्यानचा ३८२ कोटींच्या पुलाची मंजुरी देण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रवक्ते ॲड अजित विघ्ने यांनी दिली. उजनी धरणावर चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान सर्वात कमी अंतर असुन या ठिकाणी बोटीतून पुर्वीपासून प्रचंड प्रवासी वाहतुक होते. या ठिकाणी एका बाजुला एन एच ६५ आणि दुसऱ्या बाजुला मध्य रेल्वेचे पारेवाडी रेल्वे स्टेशन आहे . वस्तुतः कुगाव पासुन जेऊरकडे मुख्य रस्त्याला येताना २२ किमी बाहेर पडावे लागते व इंदापुरकडे जाताना १० किमी चे कळाशीपासुन अंतर आहे मात्र पोमलवाडी ते चांडगाव पुल झाल्यास लोणी देवकर पासुन बारामती , अकलुज, पंढरपुर, फलटण, शिखरशिंगणापुर तसेच राशिन, करमाळा टप्प्यात येणार असुन या ठिकाणी साधारण ३५० मीटरचा पुल उभा राहील्यास दळणवळण वाढणार आहे . या ठिकाणाहुन ब्रिटीश काळात देखिल साखळीवरची लाँच चालत होती त्याच्या खुणा , मनोरे अजुनही पाणी खाली जाताच दिसतात . या ठिकाणचा पुल होण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी माननीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिनजी गडकरी यांनाही साकडे घातलेले असुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही मागणीचे निवेदन दिलेले आहे. याशिवाय भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गणेश कराड , नरेंद्र ठाकुर व इतर पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदन दिले आहे . वस्तुतः या पुलाची निविदा प्रक्रिया होण्यासाठी मागिल पुरवणी अर्थसंकल्यात पाठपुरावा झालेला असुन निधी अभावी हे काम पुढील सरकारचे काळात निश्चित पुर्ण करणार असल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळोवेळी केलेले आहे . याशिवाय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान पुल साकारण्या बाबतचे अभिवचन निवडणुक काळात मतदारांना जाहीरनाम्यातूनही दिलेले आहे . वस्तुतः चांडगाव ते पोमलवाडी दरम्यानचा पुल हा पर्यटन मार्ग म्हणून व रस्ते आणि रेल्वे वहातुक जवळ आणणारा व मराठवाडा चे पश्चिम महाराष्ट्राला कनेक्ट करणारा अत्यंत जवळचा मार्ग होणार आहे. यासाठी येथील नागरिक प्रयत्नशील असुन सरकार दरबारी मागणी करीत आहेत.
*चांडगाव ते पोमलवाडीचा पुल सर्वात कमी अंतरातला मध्यवर्ती पुल – सरपंच सचिन वेळेकर -केत्तुर*
—–
*चांडगाव ते पोमलवाडीचा पुल होण्यासाठी देलवडी सह तीस ग्रामपंचायतीचे ठराव सादर केले आहेत – सरपंच सुनील ढवळे , देलवडी*
—
*चांडगाव ते पोमलवाडी पुलाचा सर्व्हे करून बारामतीच्या इंजिनीयरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवला आहे संपुर्ण अंदाजपत्रकीय आराखडा,उजनीवरील सर्वात कमी अंतरातील पुल*- राजेंद्रसिंह पाटील संचालक जिल्हा दुध संघ
—
*चांडगाव ते पोमलवाडीचा पुल प्राधान्याने साकारणारच – आमदार व मात्री मंत्री दत्तात्रय भरणे*
—–
*चांडगाव ते पोमलवाडी दरम्यानचा पुलामुळे आरोग्य सुविधा , शिक्षण सुविधा यासह उदयोग व्यवसाय आणि रोजगार वाढीला चालना मिळेल याची खात्री – माजी आमदार संजयमामा शिंदे
—
*चांडगाव ते पोमलवाडी दरम्यानचा पुल साकारणारच हा या भागातील लोकांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे , वेळ प्रसंगी केत्तुर पोमलवाडी पुलाप्रमाणे गरज भासल्यास जनहीत याचिका देखिल दाखल करू*- ॲड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…