Categories: करमाळा

कृषी विद्यापीठांची निर्मिती शेतकरी हितासाठीच… वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा यांचे सरपडोह येथे प्रतिपादन…


करमाळा प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी यासाठीच महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची निर्मिती शासनाने केलेली असून विद्यापीठाच्या चार भिंतीमध्ये बंदिस्त असलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनानुसार करमाळा तालुक्यातील फार्मर कप स्पर्धेत सहभागी असणाऱ्या शेतकरी गटांनी केल्यामुळे करमाळा तालुक्यात यावर्षी निश्चितच तुरीचे उच्चांकी उत्पादन होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती येईल असा विश्वास मला वाटतो असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिश्रा यांनी केले.सरपडोह तालुका करमाळा येथे कृषी संशोधन केंद्र बदनापूर ,आत्मा करमाळा व जिद्द शेतकरी गट , जिजाऊ च्या लेकी शेतकरी गटाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते
याप्रसंगी व्यासपीठावर पाणी फाउंडेशन चे सीईओ सत्यजित भटकळ कृषी अधिकारी डी एल मोहिते, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, कृषी संशोधन केंद्र बदनापूरचे डॉ.दीपक पाटील वरिष्ठ शाश्त्रज्ञ् (पैदास्कर),डॉ. किरण जाधव वरिष्ठ शास्त्रज्ञ् (कृषी विद्या),डॉ. ज्ञानदेव मुटकुळे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ् ,
डॉ. विष्णू गित्ते (पैदास्कर ),डॉ. प्रशांत सोनटक्के
रोगशास्त्रज्ञ् तसेच महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे
डॉ.नंदकुमार कुटे ,डॉ.अनिल दुर्गुडे उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ.मिश्रा म्हणाले की पाणी फाउंडेशन केवळ सामाजिक बांधिलकीतून वॉटर कप, फार्मर कप या माध्यमातून काम करत आहेत. खरं तर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कामच पाणी फाउंडेशन पुढे घेऊन जात आहे. अतिशय आत्मीयतेने आणि तळमळीने हे काम केले जात असल्यामुळे पाणी फाउंडेशनची चळवळ ही लोकचळवळ झाली आहे त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी , महिला शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याबद्दल मी समाधानी असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी फिसरे व सरपडोह येथील तुर पिकांच्या प्लॉटची पाहणी कुलगुरू व शास्त्रज्ञांनी केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी फाउंडेशन चे विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख यांनी केले.पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण ,कृषी अधिकारी डी एल मोहिते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी महेंद्र देशमुख,जयश्री कुलकर्णी ,गणेश देवकर,हनुमंत रोकडे ,अरूण चौगुले,हिराजी राऊत डॉ.विकास वीर या शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक आशिष लाड यांनी केले तर आभार कृषी विभाग आत्माचे अजय कुमार बागल यांनी मानले .याप्रसंगी तालुक्यातील ३५ शेतकरी गटांचे ४०० सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट…
लवकरच इतर फळ पिकांच्या शेती शाळा सुरू होणार – डॉ.सत्यजित भटकळ.
करमाळा तालुक्यामध्ये फळ पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आहे .आंबा,पेरू या पिकांच्या शेती शाळा सुरू असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार इतर फळ पिकांच्या शेती शाळा लवकरच सुरू होणार असून महाराष्ट्रातील शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्या यांना आवश्यक ते ज्ञान देण्यासाठी पाणी फाउंडेशन ची टीम सदैव कार्यरत असेल अशी माहिती डॉ.भटकळ यांनी दिली.

चौकट…
एकत्रित तूर विक्रीसाठी प्रयत्नशील…
तालुक्यातील शेतकरी गटांनी शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या सर्व एसओपीचे पालन करून अतिशय उत्तम दर्जाची तुर उत्पादित केली असून ही तुर सर्व शेतकरी गट एकत्रितरीत्या विक्रीसाठी प्रयत्न करतील अशी माहिती तालुका समन्वयक आशिष लाड यांनी दिली

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

4 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

9 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

14 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

21 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago