Categories: करमाळा

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा यांच्या पुढाकारातून कृषी योद्धा शेतकरी गट फिसरे, राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी करमाळा व कुंभारगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनी यांच्या वतीने दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी अथर्व मंगल कार्यालय करमाळा या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक ( सोलापूर ग्रामीण ) श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते व श्री. सागर वाकचौरे ( कळस कृषी प्रदर्शन,ता. संगमनेर ) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे .या प्रदर्शनामध्ये कृषीतज्ञ् , केळी जाचक पॅटर्नचे जनक कपिल चाचक व डाळिंब मार्गदर्शक, कृषी तज्ञ,उद्यम पंडित राहुल रसाळ तसेच पाणी फाउंडेशन चे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ हे मार्गदर्शन करणार असून या प्रदर्शनाचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन करमाळा तालुका पाणी फाउंडेशनचे समन्वयक प्रतीक गुरव व आशिष लाड यांनी केले आहे.
हे प्रदर्शन सकाळी ९ वाजता सुरू होणार असून या प्रदर्शनामध्ये फळबाग रोपे : जी ९- केळी टिशू कल्चर, डाळिंब, आंबा, एक्झॉटिक भाज्या व फळांची रोपे, हायटेक नर्सरी,सेंद्रिय शेती व उत्पादने: दहा ड्रम संच, गांडूळ खत, बायोगॅस, माती परीक्षण, गावरान सेंद्रिय बियाणे- भाजीपाला,अद्ययावत तंत्रज्ञान व स्मार्ट शेती : हवामान संच, सोलर पंप, फवारणी ड्रोन, ठिबक संच- उपकरणे, बजाज ऑटो, शेततळे कागद, शेटनेट हरितगृह,पशुधन: पशुखाद्य, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन, मत्सव्यवसाय,शेती विषयक संस्था : कृषि विभाग, गट शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि उद्योग व लघु उद्योगासाठी कर्ज बँक हे स्टॉल असणार असून विशेष आकर्षण म्हणून महिलांसाठी लाडकी बहीण लकी ड्रॉ असून विजेत्या महिलेला शिलाई मशीन भेट देण्यात येणार आहे. तसेच खिलार -महाराष्ट्राची शान बैलजोडी व देश विदेशातील डॉग हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये पानी फाऊंडेशन, कृषि विभाग -महाराष्ट्र शासन, उमेद अभियान, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, करमाळा पोलीस स्टेशन, SV मॉल, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्था सहभागी असणार आहेत.प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : ९७२३५२१४००, ८६६८९८३२६२, ९९०१८४८३१२ या क्रमांकावरती साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट – फार्मर कप मधील महिला गटांचा होणार विशेष सन्मान-अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये करमाळा तालुक्यातील महिला एकत्र येऊन प्रथमच आपल्या – आपल्या गावामध्ये महिलांचे गट स्थापन करून शेती करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घोटी ,शेलगाव क, पोटेगाव,फिसरे, कुंभारगाव, वीट, सरपडोह, हिसरे, साडे व कोर्टी येथील महिला शेतकरी गटांचा समारोप कार्यक्रमात विशेष सन्मान होणार आहे.तसेच तुर या पिकामध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे राहुल राऊत (कुंभारगाव)व मका या पिकांमध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे अक्षय शेंडे (घोटी)यांचाही विशेष सन्मान होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago