Categories: करमाळा

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू आहे.दिवसेदिवस या वाळु उपशाचे प्रमाण वाढत चालले आहे.हा वाळू उपसा तात्काळ बंद करावा अशी मागणी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
याबाबत आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की,करमाळा
तालुक्यातील उजनी धरणाकाठावरील वांगी,चिखलठाण,खातगाव, येथे वाळू उपसा अवैधरित्या सुरु असल्याच्या तक्रारी महसूल विभाग व माझ्याकडे येत आहे. गेले वर्षापासून करमाळा तालुक्यातील सीना नदी भीमा नदी व उजनी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून तालुक्यातील रस्ते खराब होऊ लागले आहेत तसेच सदर वाळू उपसा हा शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता दिवसरात्र सुरु आहे. उजनी धरणातील लाखो ब्रास वाळू माफिया उचलत असल्यामुळे शासनाचा महसूल (रॉयल्टी) बुडत आहे.
पोलिसांची व महसूल विभागाच्या अधिकारी यांची भूमिका माफियांना प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा आहे.अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.
वाळू माफिया हे असून साम,दाम दंडासह लोकांना धमकावून,आर्थिक तोड-पाणी करून गावागावात दहशतीचे वातावरण करत आहेत.
गावातील सलोखा बिघडत चालला आहे. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरात वाळू माफियांचा उघड वावर असल्याचे लोक खाजगीत बोलत आहेत.अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफी यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अवैध वाळू वाहतुकीमुळे करमाळा तालुक्यातील रस्ते खराब होत असून अपघाताचे प्रमाण वाढत असून त्यामुळे शासनाचे रस्ते दुरुस्तीचा खर्च वाढत आहे.
एका बाजूला उजनी पर्यटनासाठी शासन प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास हे वाळूमाफिया करत आहेत
करमाळा तालुक्यातून उजनी धरणातील अवैधरित्या वाळू उपसा माफियावर योग्य कारवाही करावी.
करमाळा तालुक्यात गेली दीड दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या सीना नदीतून तसेच भीमा नदी पात्र व उजनी धरणातून हा अवैदरीत्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यामुळे वाळू माफी यांची दहशत या भागात वाढली असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वाळू उपसा करत असताना दमदाटी करणे धमकावणे जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार वारंवार घडत आहेत तसेच वाळू वाळू उपसण्यावरून मागील काही दिवसापूर्वी करमाळा तालुक्यात जीव घेणे हल्ले झाले आहेत मात्र याबाबत पोलिसांनी व महसूल अधिकारी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेचे दिसून येत नाही.

प्रतिक्रीया

विधानसभा निवडणूक झाल्यापासून माझ्याकडे वाळू उपसा सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आले आहे केली दोन-तीन वर्षापासून हा वाळू सुरू आहे या वाळू उपशातून अनेक तंटे निर्माण होत आहेत शासनाचा महसूल पडत आहे रस्ते खराब होत आहेत पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे या वाळू उपशाला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि हा वाळू उपसा बंद झाला पाहिजे.तसेच वाळू माफिया यांचेवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करून उपसा बंद झाला नाही तर याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.
आमदार नारायण पाटील करमाळा

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

10 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago