भागवत कथा ऐकल्याने आपले मन आणि शरीर शुद्ध होते असे म्हणतात. जो व्यक्ती भागवत कथा ऐकतो त्याला सुख-शांती प्राप्त होते. म्हणून माणसाने सतत भगवंताची आराधना व उपासना करावी आणि आयुष्यात एकदा तरी भागवत कथा ऐकावी. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने आपल्या जन्मजन्मातील पापे नष्ट होतात व ती श्रवण केल्याने मनाचा आध्यात्मिक विकास होतो. आणि जिथे इतर युगात मोक्षप्राप्तीसाठी कठोर परिश्रम आणि परिश्रम करावे लागले, तिथे कलियुगात श्रीमद भागवत कथा ऐकूनच मोक्ष प्राप्त होतो. भागवत कथा ही कल्पवृक्षासारखी आहे जी आपल्या इच्छा पूर्ण करते.भागवत कथा ऐकल्याने आपले मन आणि शरीर शुद्ध होते असे म्हणतात. माणसाने सतत श्रीकृष्ण भगवंताची आराधना व उपासना करावी आणि आयुष्यात एकदा तरी भागवत कथा ऐकावी. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने आपल्या जन्मजन्मातील पापे नष्ट होतात व ती श्रवण केल्याने मनाचा आध्यात्मिक विकास होतो. आणि जिथे इतर युगात मोक्षप्राप्तीसाठी कठोर परिश्रम आणि परिश्रम करावे लागले, तिथे कलियुगात श्रीमद भागवत कथा ऐकूनच मोक्ष प्राप्त होतो. भागवत कथेत श्रीकृष्ण जन्म सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला . श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे यशस्वीपणे संयोजन संकेत खाटेर मोक्षा खाटेर चि.खुश यांनी केले असून श्रीकृष्ण जन्म सोहळा भाविकांनी यामध्ये नृत्य करीत श्रीकृष्ण नामाचा गजर करीत आनंदात उत्सव साजरा केला. भागवत कथा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी गजानन महाराज मंदिर समितीचे पुजारी रवींद्र विद्वत, प्रदीप देवी, शशिकांत कुलकर्णी,नितेश देवी, संकेत खाटेर सौ.मोक्षा खाटेर वर्धमान खाटेर, नरेंद्रसिंह ठाकुर, दिनेश मडके गिरीश शहा ,गंधे काका,संतोष काका कुलकर्णी,स्वाती मसलेकर ,मनीषा मसलेकर,ॲड लता पाटील, मेघाली आडकर सुरेखा घाडगे ,स्वाती कापसे उषा महाजन ,शैलजा भणगे ,शुभदा शिलवंत, सुरेखा घाडगे, उषा महाजन यांनी परिश्रम घेत आहेत. भागवत कथेच्या प्रारंभी साध्वी परमपूज्य अनुराधा पंढरपूर यांची रथामधून करमाळा शहरातून बॅन्ड पथकासह भव्य सवाद्य मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली. श्री गजानन महाराज मंदिराच्या अकरावी वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यात करमाळा शहर व तालुक्यातील स्त्री पुरुष यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. भागवत ज्ञानयज्ञ कथा सोहळा यशस्वीपणे संपन्न होत आहे. भागवत कथा समाप्ती शुक्रवारी २७ डिसेंबरला होणार असून भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनानंतर बऱ्याच वर्षानंतर करमाळ्यात भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होत असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानुन कौतुक केले आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…