Categories: करमाळा

राहुल रसाळ आणि कपिल जाचक ही ज्ञानाची विद्यापीठे… कमलाई कृषी प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन प्रसंगी डॉ. अविनाश पोळ यांचे करमाळा येथे प्रतिपादन.


करमाळा प्रतिनिधी
१५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५० वर्षापासून केळी क्षेत्रामध्ये काम करणारे जाचक कुटुंबीय ही ज्ञानाचे विद्यापीठे असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हेच ज्ञानाचे दालन खुले करण्यासाठी आज राहुल रसाळ आणि कपिल जाचक यांना कमलाई कृषी प्रदर्शन मध्ये निमंत्रित केले असल्याचे प्रतिपादन पाणी फाउंडेशन चे मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ यांनी उद्घघाटनप्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर कळस कृषी प्रदर्शनाचे प्रमुख सागर वाकचौरे, कपिल चाचक, राहुल रसाळ, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पाणी फाउंडेशन चे रवींद्र खोमणे, विभागीय समन्वयक संतोष शिंनगारे, सुखदेव भोसले, विक्रम फाटक,उमेद चे योगेश जगताप,प्रा.लक्ष्मण राख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कपिल जाचक म्हणाले की, जळगाव पाठोपाठ करमाळा तालुका हा आता केळीचा समुद्र बनला आहे नव्हे तर तो एक्सपोर्ट चा समुद्र बनलेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक केळी एक्सपोर्ट होण्याच्या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले पाहिजे. पारंपरिक पद्धतीने केळी लागवड न करता ती जोड ओळ या पद्धतीने केली पाहिजे त्याचा फायदा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी होतोच त्याचबरोबर अंतर मशागत करणेही सोपे जाते.केळी हे पीक सूर्यप्रकाशाचे भुकेलेले असते त्यामुळे लागवड ही नेहमी उत्तर दक्षिण याच पद्धतीने केली पाहिजे.केळीच्या शेतामध्ये कसलाही काडी कचरा न ठेवता तो बाहेर काढून आपण त्याचे खत तयार केले पाहिजे. या साध्या साध्या गोष्टींचे आपण पालन करत गेलो तर केळी निर्यात करणे अजिबात अशक्य नाही. त्याचबरोबर केळीसाठी जे अन्नघटक आवश्यक आहे त्याची मात्रा नियमितपणे ड्रेंचिंग च्या माध्यमातून गेली पाहिजे. वेगवेगळ्या कंपन्यांचे फसवे खते आणि औषधे वापरून कर्जाचा बोजा वाढवण्यापेक्षा शेतकऱ्यांनी वेळ आणि काळ पाहून त्या त्या वेळेला आवश्यक ती पाणी आणि खतांची मात्रा दिली पाहिजे असे केल्यास शेतकऱ्यांचा एकरी उत्पादन खर्चही कमी होईल आणि केळी निर्यात करणे ही सहज शक्य होईल.अवाच्या सव्वा केळीच्या घडाची लांबी वाढवली आणि साईज वाढवली म्हणजे तो मला एक्स्पोर्ट होतो हा गैरसमज आहे. एकरी जास्तीत जास्त 40 टनापर्यंत उतार एक्सपोर्ट साठी चालतो व केळीच्या घडाचे वजन 27 ते 30 किलो या दरम्यान असले पाहिजे.केळीच्या घडाला जास्तीत जास्त ९ फण्या आल्या पाहिजेत किंवा आपण त्या राखल्या पाहिजेत. एवढं मजबूत नियोजन केल्यास केळी निर्यातीत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हात आजच्या घडीला तरी कोणीच धरू शकणार नाही असा ठाम आशावाद त्यांनी व्यक्त केला.
डाळिंब या फळ पिकाविषयी मार्गदर्शन करताना राहुल रसाळ म्हणाले की गेले २० वर्षापासून डाळिंब या पिकांची लागवड आम्ही सातत्याने करत आहोत. हे करत असताना यामध्ये आतापर्यंत कधीही फेल गेलेलो नाही,याचे प्रमुख कारण म्हणजे या पिकाला खत आणि पाणी देण्याच्या वेळा व फवारणी करण्याची वेळही आम्ही काटेकोरपणे पळत आलेलो आहोत. फवारणीसाठी जे पाणी आपण वापरतो त्यामध्ये क्षार नसले पाहिजेत जर त्या पाण्यामध्ये अधिक क्षार असतील तर औषधाची मात्रा लागू होत नाही. फवारणी करत असताना तापमान ४० पेक्षा अधिक असेल तर आपल्या फवारणीतील ५०% खत हे बाष्पीभवन द्वारे उडून जाते. त्यामुळे फवारणीची ही वेळ आपण योग्य निवडली पाहिजे.शेतकऱ्यांकडे आधुनिक काळात शेती करत असताना हायड्रोमीटर ,टीडीएस मीटर हे मीटर असलेच पाहिजेत कारण आपण पिकांसाठी जी महागडी खते आणि औषधे वापरत असतो त्यातील ५०% वायाला जाणारा खर्च हे दोन मीटर वाचवू शकतात.
उद्घाटन पर मार्गदर्शन करताना कळस कृषी प्रदर्शनाचे प्रमुख सागर वाकचौरे म्हणाले की पहिल्याच वर्षी कमलाई कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुढील वर्षी प्रात्यक्षिकयुक्त कृषी प्रदर्शन भरवावे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये अधिकची भर पडेल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख यांनी केले तर आभार कुंभारगाव ऍग्रो चे महेंद्र देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुजाता भोर यांनी केले.

चौकट –
चेंज मेकर पुरस्कार देऊन तालुक्यातील १० महिला गटांचा व विक्रीम उत्पन्न घेणाऱ्या २ शेतकऱ्यांचा झाला सन्मान –
१.महालक्ष्मी महिला शेतकरी गट साडे
२.अन्नपूर्णा महिला शेतकरी गट पोटेगाव
३.संघर्ष महिला शेतकरी गट कोर्टी
४.जिजाऊ महिला शेतकरी गट फिसरे
५. जिजाऊंच्या लेकी महिला शेतकरी गट सरपडोह
६. मदार महिला शेतकरी गट घोटी
७.कुटुंब महिला शेतकरी गट कुंभारगाव
८. क्रांती ज्योती महिला शेतकरी गट शेलगाव (क)
९. राजमाता महिला शेतकरी गट वीट
१०.कृषी क्रांती महिला शेतकरी गट हिसरे

वैयक्तिक पुरस्कार
१. राहुल राऊत (कुंभारगाव) एकरी तुर 18.20 क्विंटल
२. अक्षय शेंडे ( घोटी) एकरी मका 45 क्विंटल

महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला . शिलाई मशीन चे बक्षीस मंजुळा जगताप (पाडळी) यांना मिळाले . तर फवारणी पंप रेणुका जाधव (कुंभारगाव) व मनीषा बोराडे ( केडगाव ) यांना मिळाले

saptahikpawanputra

Recent Posts

भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…

1 day ago

करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…

1 day ago

करमाळा शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या हस्ते भाजपा शहर उपाध्यक्षपदी राजू सय्यद यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी करमाळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर मंडल…

1 day ago

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

3 days ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

3 days ago