Categories: करमाळा

सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरताल महोत्सवाचे आयोजन*


करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे दि. ६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सुरताल संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हा शिक्षक सोसायटी देवीचामाळ रोड येथे होणार आहे. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व पालसप्रिया दास (धारवाड) गायन , संगीता सरकार (कोलकता) कथक नृत्य , मोउलिमा राज (कलकत्ता) भरतनाट्यम ,
सायंतनी चक्रवर्ती (मुंबई) भरतनाट्यम,
निर्मला नेगी (स्वाईनडाऊन उत्तराखंड) कथक नृत्य इत्यादी कलाकारांचे गायन वादन व नृत्य सादरीकरण होणार आहे. यावेळी सुरताल संगीत विद्यालयातर्फेतील दिला जाणारा मानाचा सुर ताल रसिक पुरस्कार सोलापूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना दिला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त आणि जागतिक कीर्तीचे कलावंत ज्येष्ठ गायक व संगीत तज्ञ डॉ विकास कशाळकर (पुणे)आणि ज्येष्ठ तबलावादक पं. पांडुरंग मुखडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दीदी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील, सहारा इन्स्टिट्यूट च्या अध्यक्षा डॉ श्रद्धा जवंजाळ, कृष्णा हॉस्पिटलच्या कविता कांबळे, डाॅ बाबुराव हिरडे समाजसेवक श्रेणिक खाटेर ,प्राचार्य मिलिंद फंड, नगरसेवक महादेव फंड ,अतुल फंड, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी संगीत रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी आव्हान केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago