Categories: करमाळा

मस्साजोगचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख परभणी येथील कै. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा याकरिता प्रा. रामदास झोळसर दशरथ आण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

करमाळा प्रतिनिधी मस्साजोग जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या, तसेच परभणी येथील आंबेडकरी आंदोलनात कै. सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू, या आपल्या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये झालेल्या घटनांबद्दल निषेध म्हणून करमाळा तहसील कार्यालयासमोर प्रा. रामदास झोळ सर व मा. दशरथ आण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. पीडितांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा. ही त्यांची प्रमुख मागणी होती. या प्रकरणां बाबत पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले की,
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या विचारांनी पावन असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना होणे हे न्यायव्यवस्थेला धरून नाही. दोषींना ताबडतोब अटक करून कडक कारवाई व्हावी. अशीही त्यांनी मागणी केली. नायब तहसीलदार मा.
लोकरे साहेब यांच्या आश्वासनांनंतर धरणे आंदोलन संपुष्टात करण्यात आले. त्यावेळी हरिभाऊ मंगवडे, गणेश मंगवडे, संजय जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक शिंदे, अमोल घुमरे, हनुमंत मांढरे-पाटील, रमेश अण्णा कांबळे, औदुंबर भोसले-पाटील, दीपक शिंदे, अमोल घुमरे, सुदर्शन शेळके, तात्यासाहेब सरडे, भीमराव ननवरे, सुहास काळे, औदुंबरराजे राजे भोसले, प्रवीण सुरवसे, भाऊसाहेब शिंदे, कांतीलाल शिंदे, श्रीराम भोरे, ऋषिकेश कांबळे, भाऊसाहेब पवार व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago