करमाळा प्रतिनिधी – मोरवड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत नेत्ररोग निदान शिबिर व चष्मे वाटपाचे आयोजन केले होते, या शिबिरामध्ये गावातील शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांचे मोफत डोळे तपासण्यात आले,
यावेळी आवश्यकतेनुसार काहींना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व ज्या पेशंटचे डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे अशा पेशंटना एच व्ही देसाई हाॅस्पिटल पुणे येथे मोफत ऑपरेशन करून देण्यात येणार आहे, या शिबिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांची व गावातील वृद्ध नागरीकांची तपासणी करण्यात आली,
या शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी गणेश चिवटे म्हणाले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी करून स्त्रियांसाठी मोलाचे योगदान दिले आहे, त्यांच्या प्रेरणेने मोरवड येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेले नेत्ररोग निदान शिबिर व मोफत चष्मे वाटप हे कार्य कौतुकास्पद आहे, आज मोबाईलच्या दुनियेत विद्यार्थ्यांना गोळ्यांच्या अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे याबरोबरच अनेक वृद्धांना आर्थिक परिस्थितीमुळे डोळ्यांचे ऑपरेशन करता येत नाही अशा सर्व वृद्धांचे मोफत ऑपरेशन होणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले ,
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, उपाध्यक्ष बंडू शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, जयंत काळे पाटील, प्रसाद गेंड, हर्षद गाडे मोरवड येथील धर्मराज नाळे, बजरंग मोहोळकर , दादा काळे, भरत नाळे, गहीनीनाथ नाळे , दत्ता काळे, अशोक काळे, उद्धव नाळे , रामचंद्र नाळे, आजिनाथ नाळे , बाबासाहेब नाळे , राजेंद्र मोहोळकर, बापू काळे, सागर काळे, शिवाजी नाळे, केशव शिंदे , महेंद्र नाळे, नामदेव शिंदे, छगन मोहोळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते,
करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…
भिगवण प्रतिनिधी : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…
करमाळा प्रतिनिधी - भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभा सदस्य नोंदणी मध्ये…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव…
करमाळा प्रतिनिधी. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने डॉ…