करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सह सीना माढा व भीमा सीना जोड कालव्यातून रब्बी पिकासाठी उद्यापासून आवर्तन सुरु होणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. काल कालवा सल्लगार समिती मधील चर्चे नंतर संबंधित खात्याना पाणी देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिल्याचेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती अशी की कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी रितेवाडी सह सर्वच प्रकल्पा बाबत आग्रही मागणी केली. सोलापूर येथे काल कालवा सल्लगार समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते तर सोलापर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांचं सह जलसंपदा व पाटबंधारे विभागातील अधिकारी व जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी नामदार विखे पाटील यांचा सत्कार करून करमाळा विधानसभा मतदार संघातील सिंचना बाबतच्या प्रश्नावर उपाययोजना व्हाव्यात म्हणून एक लेखी निवेदनही सादर केले. तसेच प्रत्यक्ष बैठकीत सिंचनाच्या समस्या मांडल्या. करमाळा तालुका हा कुकडी प्रकल्पतील शेवटचे टोक असल्याने जवळपास 257 कि मी अंतरावरून आमच्या तालुक्याला हक्काचे राखीव असलेले 5.50 टीमसी पाणी मिळत नसल्याची तक्रार आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवली. तसेच यावर उपाययोजना म्हणून नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना मान्यता देऊन कार्यान्वित केली जावी व या योजने द्वारे उजनीत येणारे पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी आम्हाला कुकडी लाभ क्षेत्रात दिले जावे अशी आग्रही मागणी केली. यावर उजनीतून पावसाळ्यात जवळपास शंभर हुन अधिक टी म सी पाणी हे धरणाचे दरवाजे उघडून अथवा ओव्हरफ्लो होऊन जाते आणि याच पाण्यातील काही पाणी आम्हाला दिल्यास कुकडी लाभ क्षेत्रातील मांगी तलावा सह सर्वच तलावत साठवण करून ठेवता येईल व यामुळे जवळपास 65 हजार क्षेत्र ऑलिता खाली येईल असेही आमदार नारायण (आबा) पाटील यांनी सांगितले. तसेच सध्या करमाळा मतदार संघातील पीक लागचाड क्षेत्रातील ऊस, केळी, गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका आदी पिकांना पाण्याची गरज असल्याने दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प, सीना माढा व भीमा सीना जोडकालचा अर्थात बोगद्यातून रब्बी आवर्तन दिले जावे अशीही मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली.यावर तातडीने मंजुरी देऊन उद्यापासून पाण्याची पाळी देण्याचे आदेश नामदार विखे पाटील यांनी अधिकऱ्यांना दिले.तसेच अद्यापही कुकडी प्रकपासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे भू भाडे मिळाले नसल्याने. भू भाड्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पैसे जमा केले जावेत अशीही मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली. या सोबतच बेंद ओढा प्रश्न मांडून या भागातील शेतकऱ्यांसाठी या बेंद ओढ्याचे पुनर्जीवन केले जाणे ही अतिशय महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नामदार विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले व या ओढ्यात आणखी नवीन गावांचा समावेश केला जावा व या भागातील सिंचन क्षेत्र वाढचाचे असा आग्रह आमदार पाटील यांनी केला. तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतील वंचित तलाव व गावांचा प्रकलपात समावेश केला जावा ही मागणी लावून धरली. यावर ज्या बाबीना तांत्रिक गोष्टी तपासून घेण्याची गरज आहे त्या तपासल्या जातील व हे प्रश्न मार्गी लावले जातील असा सकारात्मक प्रतिसाद नामदार विखे पाटील यांनी दिला.