Categories: करमाळा

करमाळा विधानसभेत गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी जिल्ह्यात एक नंबर होईल – चेतनसिंह केदार

करमाळा प्रतिनिधी – भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभा सदस्य नोंदणी मध्ये जिल्ह्यात एक नंबर राहील असे प्रतिपादन भाजपा (प) चे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी केले आहे .भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाची बैठक करमाळा येथील केमिस्ट भवन येथे चेतनसिंह केदार यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना केदार म्हणाले की, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे व त्यांची टीम ही गेली अनेक वर्षापासून भाजपचे काम करीत आहे. त्यांनी करमाळा तालुक्यात भारतीय जनता पार्टी घराघरापर्यंत पोहोचवली आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी होईल असा मला विश्वास आहे.
यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपण एक नंबरची सदस्य नोंदणी करण्यासाठी खुणगाठ बांधावी व सर्वांनी जोमाने जास्तीत जास्त नोंदणी करावी यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून येणाऱ्या काळात आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी, आगामी काळात आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून जास्तीत जास्त भाजपाचे सदस्य करावेत असे आवाहन त्यांनी केले,
या बैठकीमध्ये तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, विजयकुमार नागवडे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले,
या बैठकीसाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार,बंडूशेठ शिंदे,आजिनाथ सुरवसे, संतोष कुलकर्णी, अशोक ढेरे, गणेश तळेकर, लक्ष्मण शेंडगे, पत्रकार दिनेश मडके, हर्षद गाडे, धर्मराज नाळे, भैयाराज गोसावी, मच्छिंद्र हाके, जयसिंग भोगे, दादासाहेब देवकर, नितीन निकम , रणजीत पवार, विष्णू रणदिवे, सुनील जाधव, संदीप काळे, प्रकाश ननवरे, किरण बागल , सयाजी जाधव, अमोल जरांडे, ईश्वर मोरे, गणेश माने, राजू सय्यद, सागर सूर्यवंशी, महिला आघाडीच्या पूजाताई माने, राजश्री खाडे, चंपावती कांबळे , रणजीत निंबाळकर, समाधान कांबळे , हनुमंत रणदिवे, गणेश परदेशी, किरण शिंदे, बापू मोहोळकर , सचिन कानगुडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा

मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…

3 hours ago

अमोल जाधव यांना ‘युवा भिम सेना’चा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार

करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…

12 hours ago

Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशशब्द फाउंडेशनचा पुणे येथे राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…

13 hours ago

मुलींनी स्वतःच्या पायावर उभा रहावे -तहसीलदार शिल्पाताई ठोकडे

करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…

1 day ago

समरसतेची वारी… साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी… साहित्यिकांची घरी’* या उपक्रमाचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…

2 days ago

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी उत्साहात साजरी*

भिगवण प्रतिनिधी  : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…

2 days ago