भिगवण प्रतिनिधी : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात शै.वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कॉलेजच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या प्रारंभाला प्रमुख अतिथी श्री. राधेश्याम पाटील, मॅनेजर सिपला कंपनी, कुरकुंभ तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदासजी झोळ सर, उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिवा सौ. माया झोळ मॅडम व चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉ. विशाल बाबर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन केले.डॉ. ज्ञानेश्वर गाढवे यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन केले, प्रा. राम निखाते यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले गेले.नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले.इंडक्शन प्रोग्राम व प्रेशर पार्टी मध्ये विविध स्पर्धा, नृत्य, गायन, आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील विविध क्लब्स आणि संघटनांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेषतः “Best Fresher स्पर्धा, “Dance Off” आणि “Singing Battle” या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग लक्ष वेधून घेत होता.या कार्यक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी आपले कलात्मक कौशल्य सादर केले. महाविद्यालयाच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांचे लेखन करत, “आपण कसे यश मिळवू शकतो?” या विषयावर शॉर्ट सेशन घेतले. यामुळे नवोदित विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची प्रेरणा मिळाली.कार्यक्रमाच्या शेवटी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी जेडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच, भविष्यात विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण अशाच उत्साहात आणि मेहनतीने सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक जीवनात एक नवा रंग घालणारा ठरला. विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन आपआपसातील मैत्रीला एक नवीन वळण दिले आणि त्याचप्रमाणे संस्थेच्या विविध परंपरांचा गौरव केला.
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…
करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…
करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…
करमाळा प्रतिनिधी - भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभा सदस्य नोंदणी मध्ये…