करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना सन्मानित करावे असे मत वंदे मातरम पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास घोलप यांनी केले. लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था करमाळा व जेऊर शाखा तसेच लोकमंगल बँक यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल पतसंस्थेचे सल्लागार विश्वास काळे पाटील प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन लोकमंगल पतसंस्थेचे करमाळा विभागाचे विभागीय अधिकारी रमण परदेशी शाखाधिकारी प्रसाद पलंगे यांनी केली होते. यावेळी पुढे बोलताना सुहास घोलप म्हणाली की भाजपचे माजी खासदार आमदार सुभाष बापू देशमुख यांनी लोकमंगल पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकाचे जीवन आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी विविध योजना राबवले असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. पत्रकारही समाजासाठी अविरत झटणारा प्रमुख घटक असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकाराची योगदान अत्यंत मोलाची असून त्यांनाही प्रपंच त्यांचे कुटुंब त्याच्या गरजा असून पत्रकारांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सहकार्य करणे गरजेचे आहे .लोकमंगल पतसंस्थेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या तर खऱ्या अर्थाने पत्रकारांचे त्यांच्या कुटुंबाचे कल्याण त्यांचा सन्मान होईल याकरिता आपण नक्कीच याचा विचार करून पत्रकारांसाठी नवीन योजनेची सुरुवात करून सामाजिक बांधीलकी जपण्याचे आवाहन पत्रकार सुहास घोलप यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके सुहास घोलप मॅनेजर रमण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार आशपाक सय्यद,नरेंद्रसिंह ठाकुर, दिनेश मडके, विशाल घोलप, शितल कुमार मोटे,दस्तगीर मुजावर, अशोक मुरूमकर, नानासाहेब पठाडे सुनील भोसले, सिद्धार्थ वाघमारे, तुषार जाधव सूर्यकांत होनप, राजू सय्यद हर्षवर्धन गाडे यांचा सन्मानपत्र कॅलेंडर पेन गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक चव्हाण यांनी केले स्वागत विभागीय अधिकारी रमन परदेशी यांनी केले तसेच लोकमंगल बँक यांच्या वतीने अक्षय भोसले यांनी विविध महामंडळ कर्ज याची माहिती दिली तसेच आभार शाखाधिकारी प्रसाद पलंगे यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर वीर, तुषार मस्तुद, प्रवीण काळे ,नंदन गाठे यांनी परिश्रम घेतले.