Categories: करमाळा

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली .करमाळा बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामधे देशभक्त माजी आमदार नामदेवराव जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन बाजार समितीचे संचालक तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले .तसेच मार्केट कमिटीच्या कार्यालयीन इमारतीसमोरील देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास करमाळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष ॲड कमलाकर वीर व बाजार समितीचे संचालक मनोज पितळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली . यावेळी ॲड वीर यांनी देशभक्त नामदेवरावजी जगताप यांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या अथक परिश्रमामुळेच आज जिल्हयात हरितक्रांती झाल्याचे नमुद केले . तसेच स्वातंत्र्य लढ्यातील व उजनी धरणाच्या निर्मितीतील स्व .जगताप यांचे योगदान, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची स्थापना, महात्मा गांधी विद्यालयाचा विस्तार, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, छत्रपती शिवाजी वसतीगृहाची उभारणी, कॉटेज हॉस्पिटलची उभारणी, डीसीसी बँकेच्या माध्यमातून केलेले अर्थसाहाय्य , एसटी महामंडळाचे माध्यमातून केलेले काम तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व विधानसभा सदस्यपदी केलेल्या ठोस कार्याचा व हजारो बेरोजगार तरुणांना दिलेल्या नोकऱ्या आदी बाबींचा आढावा याप्रसंगी ॲड वीर यांनी आपल्या मनोगतातून घेत स्व . जगताप यांच्या कार्याचे स्मरण व कृतार्थता व्यक्त केली .या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक हनुमंत ढेरे, बाजार समितीचे माजी संचालक मयूर जोशी ,माजी सचिव दत्तात्रेय क्षिरसागर, सचिव विठ्ठल क्षिरसागर, सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे ,व्यापारी प्रीतम लुंकड , राजेंद्र चिवटे, तालुका गटसचिव पतसंस्थेचे चेअरमन अनिल सुरवसे ,जिल्हा बँकेचे बँक इन्स्पेक्टर नगरे यांचे सह व्यापारी, कर्मचारी, शेतकरी, गटसचिव आदी उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago