Categories: करमाळा

नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत सेवानिवृत्ती निमित्त संतोष काका कुलकर्णी यांचे गौरवोद्गार

करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता करमाळा येथील मुख्याध्यापिका यांच्या सेवानिवृत्तीच्या आयोजित समारंभात भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील होते. पुढे बोलताना संतोष काका कुलकर्णी म्हणाले की विद्वत मॅडम यांनी एक आदर्श शिक्षिकेच्या भूमिकेतून गोरगरीब मुलांना मार्गदर्शन करून त्यांना यशस्वी करण्याचा खूप मोठ काम त्यांनी केलेला आहे .त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा केली त्या ठिकाणी पालक ग्रामस्थांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून शाळा आणि गाव यामध्ये एकोप्याचे संबंध निर्माण करून शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचा योगदान दिलेले आहे पालकांना आपल्या मुलांच्या भविष्या बाबत कायम जागरूक ठेवण्याचे काम त्यांनी केले आपल्या सेवेमध्ये वेळप्रसंगी स्वतः काही मुलांच्या फीस भरून त्यांना सहकार्य द्यायचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आपले कार्य हे निरपेक्षपणे करत राहून त्यामधून समाजाची सेवा केली आहे हे सर्व करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कलागुणांना वाव देण्याचे काम केलेलं आहे सर्व शिक्षकांमध्ये सौदर्याचे वातावरण निर्माण ठेवून आपली शाळा कायम गुणवत्ता च्या आधारावर प्रथम कशी येईल यासाठी त्यांचा कायम प्रयत्न करायचा आणि त्यासाठी त्या अविरतपणे कार्य करत होत्या हे सर्व करत असतानाच त्यांना समाजातील असणाऱ्या वेगवेगळ्या संवेदना त्यांनी कवितेच्या रूपातून समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला अशा या सर्व गुण संपन्न विद्वत मॅडम सारखे शिक्षक नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श ठरणार आहे यावेळी समितीचे माजी अध्यक्ष सचिन गात केंद्रप्रमुख दामाजी श्रीरामे प्रसाद विद्वत चंद्रहार चोरमोले सर अश्विनी विद्वत यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी दिव्यांग संघटना सोलापूरचे अध्यक्ष विजय काका कुलकर्णी सरपंच प्रतिनिधी दादा भांडवलकर केंद्रप्रमुख रामेश्वर लोंढे शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीचे सचिव नीलकंठ ताकमोगे माजी मुख्याध्यापक दत्तात्रय दास
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश जगताप सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत जाधव केंद्रातील मुख्याध्यापक अरविंद पाटील शिवाजी फरतडे त्याचबरोबर निवृत्त पीएसआय देवराव सुकळे , निवृत्त पोस्टमास्तर हरी काका विद्वत उद्योजक संतोष काका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी केंद्र शाळा वरकुटे ,ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विद्वत मॅडम यांच्या परिवारातर्फे उपस्थित सर्व मान्यवर यांना भारतीय राज्यघटनाचे संविधान पुस्तक भेट म्हणून देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गोसावी सर प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय बेडकुते तर आभार सचिन देशमुख यांनी मानले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे शहीद नवनाथ गात मित्र मंडळ त्याचबरोबर कोटलिंग मित्र मंडळ वरकुटे यांनी विशेष प्रयत्न परिश्रम केले . यावेळी सालसे केंद्रातील अनेक शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

18 hours ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

23 hours ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

1 day ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

2 days ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

2 days ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

3 days ago