जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने 17 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन दत्त मंदिर करमाळा विकास नगर ‌ येथे सकाळी आठ ते सहा या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ०४ जानेवारी २०२५ ते दि. १९ जानेवारी २०२५ पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने 17 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये दत्त मंदिर विकास नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सिकलसेल ॲनेमिया, हिमोफिलीया, पॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्ताबाटल्या देण्याचे काम नरेंद्राचार्य संस्थान संप्रदायामार्फत निश्चित केले करून सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त ५ मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत, तुमच्यासाठी ते आहे फक्त दान, मात्र गरजुंसाठी ते आहे जीवनदान स्वतः बरोबर आपल्या मित्र व नातेवाईकांस या महान रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करा आपल्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी आपला बहुमोल वेळ काढून खालील ठिकाणी रक्तदान करण्यास येवून या सामाजिक कार्यात सहभागी होवून आम्हास उपकृत करावे असे आवाहन जगद्गगुरू  नरेंद्राचार्य महाराज भक्त  सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत सेवानिवृत्ती निमित्त संतोष काका कुलकर्णी यांचे गौरवोद्गार

करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

2 days ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

2 days ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

3 days ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

3 days ago