Categories: करमाळा

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी यांची ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाला येथे सदिच्छा भेट

. करमाळा प्रतिनिधी दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी(डी फार्म) स्वामी चिंचोली, तालुका:दौंड जिल्हा:पुणे येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली. दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री प्रा. रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री राणा दादा सूर्यवंशी साहेब, सचिवा सौ माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉ.विशाल बाबर सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी.जेडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय रुई येथील रुग्णालयास भेट देऊन तेथील क्ष- किरण विभाग, औषध विभाग, रोग निदान विभाग व अतिदक्षता विभाग इ. विभागास भेट देऊन, रुग्णालयाचे कामकाज कशा प्रकारे चालते? तेथील डॉक्टर कर्मचारी व पेशंट यांची भेट घेऊन रुग्णालया विषयीची माहिती जाणून घेतली. तसेच विश्व चैतन्य आयुर्वेदिक रस शाळा या ठिकाणी जाऊन कच्च्या मालाचा विभाग, पक्क्या मालाचा विभाग ,विश्लेषणात्मक विभागात क्यू ए क्यू सी, तयार औषधे व औषध वनस्पती उद्यान या विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच वॉटर पुरिफिकेशन, प्लांट गार्बेज ट्रीटमेंट प्लांट या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी तेथील विविध प्रकारच्या विभागांना भेटी देऊन तेथील कामकाजाची संपूर्ण माहिती आत्मसात केली. तसेच महाविद्यालयांमधील प्रा. श्री श्रेयस बंडगर सर, प्रा. रणजीत साखरे सर, आणि प्रा. रक्षा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांसोबत वरील सर्व ठिकाणची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना पुढील भविष्यात संधी बाबत मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago