Categories: करमाळा

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे विद्या विकास मंडळाचे सचिव, यशवंत परिवाराचे आधारस्तंभ आदरणीय विलासरावजी घुमरे सर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये यशवंत युवा महोत्सवचे आयोजन केलेले आहे. यशवंत युवा महोत्सवानिमित्त महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आलेले आहे. 31 जानेवारी 2025 रोजी *मिस मॅच डे* चे आयोजन केलेले आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी *संगीत खुर्ची व लिंबू चमचा* महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले आहे. दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी *रॅम्प वॉक,मिस वाय. सी.एम. व शेलापागोट्याच्या* कार्यक्रमचे आयोजन केले ले आहे. दिनांक 04 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळी 10 वाजता *सांस्कृतिक कार्यक्रमाचे* आयोजन केलेले आहे. दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता *रक्तदान शिबिराचे* आयोजन केलेल आहे. तर दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता यशवंत परिवाराच्या वतीने परिवाराचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आदरणीय श्रीं. विलासरावजी घुमरे सर यांचा *सन्मान सोहळा* संपन्न होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम व सुप्रसिद्ध वक्ते श्री.गणेश शिंदे यांचे *भविष्यावर बोलू काही* या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे . महाविद्यालयात यशवंत युवा महोत्सवाच्या निमित्ताने व आदरणीय विलासरावजी घुमरे सर यांच्या वाढदिवसाच्या वाढदिवसानिमित्ताने महाविद्यालयात भरगच्च अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago