Categories: करमाळा

तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी मानवतेची शिकवण देऊन आत्मनिर्भ‌र जीवन जगण्यासाठी नरेंद्राचार्य महाराजांच्या सांप्रदायाचे कार्य अनुकरणीय-प्राचार्य मिलिंद फंड सर

करमाळा प्रतिनिधी तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी मानवतेची शिकवण देऊन आत्मनिर्भ‌र जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या नरेंद्र महाराजांच्या स्व स्वरूप सांप्रदायाचे कार्य अनुकरणीय असल्याचे मत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी केले. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा सेवा केंद्राचे अध्यक्ष नरेशकुमार माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत दोन लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप मिलिंद फंड सर यांच्या हस्ते करण्यात आले. नरेशकुमार माने यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका सेवा समिती यांच्यावतीने केक कापून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाली की परोपकार करून दुसऱ्याचे जीवन सुखी संपन्न ‌ करण्यासाठी दानाचे महत्त्व आध्यात्मिक कार्याद्वारे करून खऱ्या अर्थाने लोक कल्याणीचे काम हा सांप्रदाय करत असल्याने या संप्रदायाचे भविष्य उज्वल असुन धर्म कार्यासाठी आपण यामध्ये सहभागी होऊन पाठबळ देणार असल्याचे प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चोरमले माजी तालुकाध्यक्ष दिनेश मडके, नंदकिशोर सरडे, आण्णासाहेब क्षिरसागर बाबासाहेब क्षिरसागर विशेष कार्यवाह संतोष हंडाळ, भाऊसाहेब पाटील, रोहन शिंदे, विक्रम शिंदे, नवनाथ भोसले, शिवाजी मारकड, ,जाधव काका उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago