गजानन क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना गजानन क्रिकेट क्लब करमाळा विरुद्ध ॲड. शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर यांच्यात झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत अहिल्यानगरच्या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १ लाख रुपये व चषक पटकावले तर द्वितीय पारितोषिक आयोजक गजानन क्रिकेट क्लब करमाळा यांनी ७५ हजार रुपये रोख रक्कम व चषक पटकावले.
स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मॉर्निंग क्रिकेट क्लब टेंभुर्णी तसेच चौथ्या क्रमांकाचे बक्षीस केसीसी क्रिकेट क्लब यांनी पटकाविले. अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार राहुल यास मिळाला. तो मालिकावीर देखील ठरला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सचिन गायकवाड यास पुरस्कार देण्यात आला. यावेळी आयोजक गजानन सोशल व स्पोर्टस क्लबचे प्रशांत ढाळे, रविंद्र वळेकर, सचिन घोलप, संजय सावंत, अतुल फंड उपस्थित होते
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…